चार अल्पवयीन मुली व इतर तीन महिला अश्या सात जणांवर लैंगिक अत्याचार 

आरोपीस आजन्म कारावासाची शिक्षा : धाराशिव जिल्हा न्यायालयाचा निकाल 
 
Osmanabad court

धाराशिव -  चार अल्पवयीन मुली व इतर तीन महिला अश्या सात जणांवर  लैंगिक अत्याचार करणाऱ्या  आरोपीस आज आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली .  हा निकाल  प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजु शेंडे यांनी दिला. 


तुळजापूरतालुक्यातील एका गावात सहा  वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना 30 ऑगस्ट 2022 रोजी घडली होती. गावकऱ्यांनी त्यावेळी एका आरोपीला अटक करुन पोलिसांच्या ताब्यात दिले होते. आरोपीने बलात्कार व त्याचे मोबाईलमध्ये व्हिडिओ चित्रीकरण केले होते. 

एक लहान मुलगी घराच्या पाठीमागे शौचास गेली असता तिला शेजारील शेतात नेहून अत्याचार केला. मुलीच्या ओरडण्याचा आवाज ऐकून काही महिला शेतात गेल्यावर आरोपी दुषकृत्य करताना दिसला, आरोपी नग्न होता त्याला तसेच पकडून चोप दिला. अंकुश वडणे  असे या आरोपीचे नाव आहे, तुळजापूर पोलिसात पोस्को कायद्याने गुन्हा नोंद करण्यात आला होता.


अंकुश वडणे याने  आजवर चार अल्पवयीन मुली व इतर तीन महिला अश्या सात जणांवर  लैंगिक अत्याचार गुन्हे केले आहेत तर त्याला दोन  वेळेस कोर्टाने यापूर्वी शिक्षा सुनावली आहे. शिक्षा भोगून आला की तो पुन्हा लहान मुलीवर बलात्कार करायचा.यापूर्वी त्याने 4, 8, 10 व 6 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला आहे.

s

शिक्षा सुनावल्यावर त्याच्या चेहऱ्यावर कोणताही पश्चाताप दुःख नव्हते तर शिक्षा सुनावल्यावर त्याच्या आईला कोर्टात रडू कोसळले. पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी सई भोरे पाटील व धाराशिव पोलिसांनी 2 महिन्यात केलेला तपास यात महत्वपूर्ण ठरला, यात 22 साक्षीदार तपासण्यात आले. आरोपीने शांत डोक्याने, पुर्वनियोजित क्रूरतेने हे कृत्य केल्याचा युक्तीवाद करण्यात येत फाशीची मागणी केली मात्र आजन्म कारावास ( जन्मठेप ) शिक्षा ठोठावण्यात  आली. 

या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून सोलापूर येथील निलेश दत्तात्रय जोशी यांची नेमणूक केली होती त्यांना ऍड वैशाली देशमुख, यशश्री निलेश जोशी, ओंकार संतोष परदेशी यांची सहकार्य केले तर आरोपी याला विधी सेवा प्राधिकरणने मदत करीत ऍड विजयकुमार शिंदे यांची नेमणूक केली. शिंदे यांनी केलेल्या कामाचे कोर्टाने कौतुक केले. आजन्म जन्मठेप ऐवजी फाशीची शिक्षा मिळावी यासाठी अपील करणार असल्याचे जोशी यांनी सांगितले

From around the web