धाराशिवमध्ये महिलेवर लैंगिक अत्याचार

धाराशिव - एका गावातील एक 50 वर्षीय महिला (नाव- गाव गोपनीय) दि. सन 2012 ते 07.10.2022 रोजी 19.00 वा.सु.सदर महिला ही एकटी असताना गावातील एका तरुणाने सदर महिला ही एकटी असल्याचा फायदा जिवे ठार मारण्याची धमकी देवुन तीच्यावर लैंगीक अत्याचार केला. तसेच घडल्या प्रकाराची कोठे वाच्यता केल्यास ठार मारण्याची धमकी दिली.
अशा मजकुराच्या पिडीतीने दि.02.06.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम-376(1), 376, (2)(एन), 354, 354(अ), 323, 504, 506 अ.जा.ज.अ.प्र. 3(1)(डब्ल्यु)(i)(ii) 3(2) (व्ही), 3(2)(व्हिए), 3(1) (आर)(एस) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
घराचे बांधकामावरून मारहाण
उमरगा : भुसणी, ता. उमरगा येथील- ईरेश स्वामी, ओमकार स्वामी यांनी घराचे बांधकाम पुर्ण करु का देत नाही या कारणावरुन दि.31.05.2023 रोजी 14.00 वा. दरम्यान कदेर शिवारातील लक्ष्मी मंदीर समोर आडवुन गावकरी- विलास मुन्ना चव्हाण यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, मारहान केली. तसेच विलास यांचे लेबर विलास यांचे बचावास आले असता त्यासही शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी रॉडने मारहान करुन गंभीर जखमी केले.
अशा मजकुराच्या विलास चव्हाण यांनी दि.02.06.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 341, 326, 323, 504, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.