उस्मानाबाद जिल्ह्यात सात वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार 

 
Osmanabad police

उस्मानाबाद  : उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून लैंगिक अत्याचाराचे गुन्हे वाढले आहेत. एका सात वर्षाच्या चिमुरडीवर एका तरुणाने लैंगिक अत्याचार केल्याने संताप व्यक्त केला जात आहे. 

एक 7 वर्षीय मुलगी (नाव- गाव गोपनीय) दि. 11.11.2021 रोजी 16.00 वा.सु. खेळताना शेजारील शेतात गेली असता त्या शेतातील एका तरुणाने तीला पत्रा शेडमध्ये बोलावून तीच्यावर लैंगीक अत्याचार करुन घडला प्रकार अन्य कोणास न सांगण्याबाबत तीला धमकावले . अशा मजकुराच्या पिडीत मुलीच्या आईने दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 376, 506 सह पोक्सो कायदा कलम- 4, 6, 8, 12 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
अपघात 

उमरगा : अज्ञात चालकाने  दि. 13.11.2021 रोजी 19.00 वा. सु. कसगी शिवारातील रस्त्यावर कार क्र. के.ए. 25 एम 2780 ही चूकीच्या दिशेने, निष्काळजीपने चालवून आळंद, जि. कलबुर्गी, राज्य- कर्नाटक येथील पादचारी-  राम बालाजी मुगळे व शंकर आप्पास केगार यांना समोरुन धडक दिल्याने ते दोघे गंभीर जखमी झाले. या अपघातानंतर जखमीस वैद्यकीय उपचाराची तजबीज न करता, अपघाताची खबर नजीकच्या पोलीस ठाण्यास न देता नमूद कारचा अज्ञात चालका कारसह अपघात स्थळावरुन पसार झाला. अशा मजकुराच्या राम मुगळे यांनी दि. 16.11.2021 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 सह मो.वा.का. कलम- 184, 134 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
मारहाण 

ढोकी  : येवती, ता. उस्मानाबाद येथील रामा गणपती सलगर यांचा ग्रामस्थ- गोरोबा हुबाले, शिवचरण हुबाले व आशिव, ता. औसा येथील बाबु देवकर व धनाजी देवकर यांच्याशी शेत जमीनीवरुन पुर्वीचा वाद आहे. राम सलगर हे दि. 16.11.2021 रोजी 13.00 वा. सु. येवती गट क्र. 139 मधील आपल्या शेतात असतांना नमूद चौघांनी तेथे जाउन रामा यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, दगड, कोयत्याने मारहान करुन जखमी केले. यावेळी रामा यांच्या बचावास आलेल्या त्यांच्या पत्नीसही नमूद चौघांनी मारहान करुन ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या रामा सलगर यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web