उस्मानाबाद जिल्ह्यात दोन अपघातात सात जखमी 

 
Osmanabad police

उमरगा ;  मुळज, ता. उमरगा येथील ज्ञानोबा कांबळे हे दि. 03.01.2022 रोजी 18.00 वा. सु. दाबका फाटा येथे रस्त्याबाजूस थांबले होते. यावेळी अज्ञात चालकाने मिनीट्रक क्र. एम.एच. 12 एचडी 3161 हा निष्काळजीपने चालवल्याने तो मिनीट्रकची कांबळे यांना पाठीमागून धडकला. या अपघातात कांबळे गंभीर जखमी झाले असता त्या अज्ञात चालकाने अपघात स्थळावरुन वाहनासह पलायन केले. अशा मजकुराच्या ज्ञानोबा कांबळे यांनी दि. 04 जानेवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 338, 279 सह मो.वा.का. कलम- 184, 134 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद  : सोलापूर येथील चालक- रेवसिध्द जिरगे हे दि. 03.01.2022 रोजी 19.00 वा. सु. उस्मानाबाद येथील वरुडा उड्डान पुलाजवळील महामार्गावर क्रुझर वाहन मागील बाजूस वळवत होते. यावेळी डिझायर कार क्र. एम.एच. 10 डीजी 6015 ने त्यांच्या क्रुझरला दिलेल्या धडकेत क्रुझर मधील चालकासह 6 प्रवासी किरकोळ जखमी होउन दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. अशा मजकुराच्या जिरगे यांनी दि. 04 जानेवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन डिझायर कारच्या अज्ञात चालकाविरुध्द भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 सह मो.वा.का. कलम-184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


अवैध मद्य विरोधी कारवाई

परंडा  : अवैध मद्य विक्री विरुध्द उस्मानाबाद पोलीसांनी दि. 04.01.2022 रोजी जिल्हाभरात 8

ठिकाणी छापे मारले. या छाप्यांतील हातभट्टी दारु निर्मीतीचा द्रव पदार्थ पोलीसांनी जागीच ओतून नष्ट केला तर अवैध मद्य जप्त करुन 8 व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य निषेध कायद्यांतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यात खालील प्रमाणे 8 गुन्हे नोंदवले आहेत.

1) कळंब पोलीसांनी 3 ठिकाणी छापे मारले असता यात हावरगाव ग्रामस्थ- आगरचंद दत्तात्रय कोकाटे हे गावातील कारखाना परिसरात देशी दारुच्या 15 सिलबंद बाटल्या बाळगलेले, पारधी पिढी, मोहा येथील बापु मक्कल काळे हे पिढीवरील मनुष्यबळ फाटा येथे 18 लि. हातभट्टी दारु बाळगलेले तर ईटकुर येथील जयश्री गोरख शिंदे या पारधी पिढी, ईटकुर येथे 15 लि. हातभट्टी दारु बाळगल्या असतांना आढळल्या.

2) तामलवाडी पोलीसांना शिवाजीनगर तांडा, ता. तुळजापूर ग्रामस्थ- विजय गुराप्पा राठोड हे तांड्यावरील काटकाव रस्त्यालगत गुळ- पाणी मिश्रीत हातभट्टी निर्मीतीचा 200 लि. द्रव पदार्थ एका लोखंडी पिंपात बाळगलेले आढळले.

3) स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास वाशी फाटा बारलोणी, ता. वाशी ग्रामस्थ- बप्पा हरि शिंदे हे हे गावातील वाशी फाटा बारलोणी येथे गुळ- पाणी मिश्रीत हातभट्टी दारु निर्मीतीचा 200 लि. द्रव पदार्थ व 18 लि. हातभट्टी दारु बाळगलेले आढळले.

4) भुम पोलीसांना वालवड, ता. भुम ग्रामस्थ- उत्तम माधव शिंदे हे गावातील साप्ताहीक बाजार परिसरात देशी दारुच्या 9 सिलबंद बाटल्या बाळगलेले आढळले.

5) बेंबळी पोलीसांना आंबेवाडी, ता. उस्मानाबाद ग्रामस्थ- सुनिल दशरथ कदम हे गावातील चिखली रस्त्यालगतच्या टपरीमध्ये देशी दारुच्या 10 सिलबंद बाटल्या बाळगलेले आढळले.

6) मुरुम पोलीसांना अचलेर, ता. लोहारा ग्रामस्थ- अब्दुल इब्राहीम शहापुरे हे गावातील जळकोट रस्त्यालगत विदेशी दारुच्या 40 सिलबंद बाटल्या बाळगलेले आढळले.

From around the web