उस्मानाबाद जिल्ह्यात दोन अपघातात सात जखमी 

 
Osmanabad police

तुळजापूर  : चालक- आकाश मल्लीनाथ हिप्परगे, रा. किणी, ता. अक्कलकोट यांनी दि. 03 ऑक्टोबर रोजी 11.45 वा. सु. तडवळा शिवारातील तुळजापूर ते सोलापूर रस्त्यावर कार क्र. एम.एच. 12 ईटी 4882 ही निष्काळजीपने चालवून नागेंद्र विजयकुमार कव्हेकर, रा. सोलापूर हे चालवत असलेल्या वॅगन आर क्र. एम.एच. 13 एसी 6389 ला उजव्या बाजूने धडक दिली. या अपघातात कारमधील नागेंद्र यांसह त्याचे वडील- विजयकुमार, बहिण- भाग्यलता व भाची असे गंभीर जखमी करुन नागेंद्र यांच्या कारचे आर्थिक नुकसान केले. अशा मजकुराच्या नागेंद्र कव्हेकर यांनी दि. 4 ऑक्टोबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद : चालक- रविंद्र अंकुश ढाकणे, रा. काठेवाडी, ता. पाथर्डी यांनी दि. 04 ऑक्टोबर रोजी 18.30 वा. सु. बावी शिवारातील राष्ट्रीय महामार्ग क्र. 52 वर मोटारसायकल निष्काळजीपने चालवून पादचारी- आमऋषी पांडुरंग तांबे, रा. बावी यांना पाठीमागून धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या सिध्दांत सुर्यभान नरवडे, रा. उस्मानाबाद यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 सह मो.वा.का. कलम- 184, 128 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


सार्वजनिक रस्त्यावर धोकादायकपने वाहन उभे करणाऱ्यावर गुन्हा दाखल

मुरुम  : आझर हारुण बागवान, रा. लोहारा यांनी दि. 04 ऑक्टोबर रोजी 10.00 वा. सु. मुरुम येथील सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायक होईल अशा रीतीने पिकअप वाहन क्र. एम.एच. 25 पी 344 हा उभा करुन भा.दं.सं. कलम- 283 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन गुन्हा नोंदवला आहे.

From around the web