धाराशिव जिल्ह्यात चोरीचे सात गुन्हे दाखल 

 
crime

तुळजापूर  : समर्थनगर, तुळजापूर येथील- विजय किसनराव शिंदे, वय 50 वर्षे यांचे घराचा  कडी कोंडा अज्ञात व्यक्तीने दि. 11.06.2023 रोजी 22.00 ते दि.12.06.2023 रोजी 07.00 वा. सुमारास तोडुन आत प्रवेश करुन सोन्या, चांदीचे दागिणे असे एकुण 80,000 ₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या विजय शिंदे यांनी दि.17.06.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

आंबी  : तांदुळवाडी, ता. परंडा येथील- दत्तात्रय भागवत हावलदार, वय 39 वर्षे यांचे घराचा  कडी कोंडा अज्ञात व्यक्तीने दि. 16.06.2023 रोजी 09.30 ते दि.17.06.2023 रोजी 07.00 वा. सुमारास तोडुन आत प्रवेश करुन सुवर्ण दागिणे व रोख रक्कम 2,000 ₹ असा एकुण 42,000 ₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या दत्तात्रय हावलदार यांनी दि.17.06.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

नळदुर्ग  : व्यासनगर, नळदुर्ग येथील- संजयकुमार चंदुलाल दुबे, वय 62 वर्षे यांचे लोहगाव शिवारातील शेत गाट नं 22 मधील विहीरीवरील विद्युत पंप अंदाजे 15,000₹ किंमतीचा हा दि.14.06.2023 रोजी 17.30 ते दि. 15.06.2023 रोजी 17.30 वा. सु. अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या संजयकुमार दुबे यांनी दि.17.06.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

तुळजापूर : चिंचवड, पुणे येथील-  प्रियंका राहुल काटकर वय 34 वर्षे या  दि.17.06.2023 रोजी 12.15  वा. सु. श्री तुळजाभवानी मंदीरात दर्शनासाठी आले असता त्यांचा अंदाजे 18,000₹ किंमतीचा मोबाईल फोन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या प्रियंका काटकर यांनी दि.17.06.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

परंडा  : पिंपरखेड, ता. परंडा येथील- राम महादेव भांगे यांची अंदाजे 35,000 ₹ किंमतीची मोटारसायकल क्र.एम.एच.25 एएक्स 2838 ही दि.14.06.2023 रोजी 18.00 वा. दरम्यान परंडा येथे आठवडी बाजारात लिंबाच्या झाडाखालून अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या रामा भांगे यांनी दि. 17.06.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 बेंबळी  : बरमगांव खु, ता. उस्मानाबाद येथील- दत्तु निवृत्ती मुळे, वय 50 वर्षे यांचे घराचा  दरवाजा अज्ञात व्यक्तीने दि. 15.06.2023 रोजी 11.00 ते 19.00 वा. सुमारास वाकवून आत प्रवेश करुन सोन्या, चांदीचे दागिणे व रोख रक्कम 5,400₹ असा एकुण 21,000 ₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या दत्तु मुळे यांनी दि.17.06.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 461, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

वाशी  :पार्डी, ता. वाशी येथील- जयसाई कन्ट्रक्शन लि.पार्डी  प्रिमिसेसे येथील अंदाजे 31,000₹ किंमतीचे 410 मिटर आरथिंग केबल हे दि. 09.06.2023 रोजी 12.30 ते 10.00 वा. सु. अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. डी. सी. बॉक्स वस्तुची तोडफोड करुन नुकसान केले. अशा मजकुराच्या  टेक्नीशियन स्वामी हरीश्चंद्र क्षिरसागर रा. पार्डी, ता. वाशी यांनी दि.17.06.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379, 427 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
 

From around the web