भूममध्ये विदेशी दारुचा साठा जप्त
धाराशिव - अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक, उस्मानाबाद यांचे आदेशाने अपर पोलीस अधीक्षक श्री. नवनीत कॉवत यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे भुम हद्दीत अवैध धंदयाची माहिती काढून कारवाई करणे कामी दि. 08.07.2023 रोजी पोलीस निरीक्षक प्रल्हाद सुर्यवंशी, सहा. पोलीस निरीक्षक, शशीकांत तवार, सपोफौ 799 ओव्हाळ, पोलीस हावलदार 1179 राकेश पवार, 1279 बाबासाहेब जाधवर, पोलीस नाईक 1547 अजित कवडे, पोलीस अंमलदार1781 विठ्ठल मलंगनेर असे अवैध धंदयावर माहिती काडुन केसेस करणे कामी रवाना झाल्याने गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर बातमी मिळाली की, एक पिकअप वाहन कृश्र एमएच 43 ए.डी. 9946 यामध्ये अवैधरित्या विदेशी दारुचा साठा असलेले पीकअप हे परंडा ते नगर रोडने जात असल्याची माहिती मिळाल्याने पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सदरचे पीकअप वाहन हे भुम शहरातील नगर रोड येथे थांबवून सदर वाहनांची तपासणी केली .
सदर वाहनामध्ये नितीन भागवत ठोंबरे वय 27 वर्षे रा. बाणेगाव, ता. केज जि. बीड, विजय बाबुराव ठोंबरे वय 32 वर्षे रा. वाघे बाभूळगाव, ता. केज. जि. बीड हे मिळून आले. त्यांना सदर वाहनामध्ये काय आहे असे विचारले असता त्यांनी काही एक माहिती दिली नाही पथकाने पीकअप वाहनामध्ये तपासणी केली असता त्यामध्ये 1) विदेशी दारु रॉयल स्टॅग कंपनीच्या 180 मिलीच्या 10 कार्टुन बॉक्स 2) इम्पेरियल ब्लु कपंनीचे 180 मिलीच्या 40 कार्टुन बॉक्स 3) मॅकडॉल नंबर वन कंपनीच्या 180 मिलीच्या 10 कार्टुन बॉक्स किं.अं. 2,20,800 ₹ तसेच पीकअप वाहन क्श्रमांक एमएच 43 ए.डी. 9946 किं. अं. 3,00,000₹ असे एकुण 5,20,800₹ किंमतीचे विदेशी दारु मिळून आल्याने त्यांचेवर महाराष्ट्र दारुबंदी कायदयाअंतर्गत कारवाई करीत आहोत.
अवैधरित्या गोमांस वाहतुक करणारे मालवाहतुक टेम्पो पकडला
तसेच मौजे नळीवडगाव ता. भुम जि. उस्मानाबाद शिवारात ग्रामस्थांनी पहाटे 02.30 वाजणेचे सुमारास अवैधरित्या गोमांस वाहतुक करणारे मालवाहतुक टेम्पो हा पकडून ठेवले बाबत पोलीस ठाण्ेस मिळालेल्या बातमीवरुन पोलीस अंमलदार यांना घटनास्थळी पाठवून एक एमएच 42 बी. एफ. 2168 अशोक लेलॅड कपंनीची मालवाहतुक टॅम्पो व त्यामध्ये असलेले आरोपी नामे अली गुलाब शेख वय 21 वर्षे रा. राहु ता. दौंड जि. पुणे, नाझील शेख लाल मुलानी वय 20 वर्षे रा. राजेगाव ता. दौंड जि. पुणे यांना ताब्यात घेवून सदर वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये अंदाजे 3 टन गोमांस किं. अं. 6,00,000 ₹ व वाहनाची किं.अं. 3,00,000 ₹ असे एकुण 9,00,000₹ मुद्देमाल मिळून आल्याने त्यांचे विरुध्द महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्या अंतर्गत कारवाई करीत आहोत.
सदरची कामगिरी अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक, उस्मानाबाद, अपर पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांचे आदेशाने एम.रमेश, सहा. पोलीस अधिक्षक मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे भुमचे प्रल्हाद सुर्यवंशी, सहा. पोलीस निरीक्षक, शशीकांत तवार, सपोफौ 799 ओव्हाळ, पोलीस हावलदार 1179 राकेश पवार, 1279 बाबासाहेब जाधवर, पोलीस नाईक 1547 अजित कवडे, पोलीस अंमलदार1781 विठ्ठल मलंगनेर यांचे पथकाने केली. .