सांजा मर्डर : आरोपीच्या चेहऱ्यावर कसलाही पश्याताप नाही 

तीन दिवसाची पोलीस कस्टडी, चार आरोपी अद्याप फरार 

 
crime

धाराशिव – शहरातील सांजा चौकात अंगाचा थरकाप उडवणारा मर्डर घडला. शेतीच्या बांधाचा वाद इतका टोकाला गेला की, पाच आरोपींची  कत्तीने व कोयत्याने सपासप वर करून एका २८ वर्षीय  तरुणाचे हात पाय तोडले. त्यात तो तळमळत असताना, एकाही माणसाला दया माया आली नाही. शेवटी त्याने प्राण सोडले. या घटनेमुळे धाराशिव शहरच नव्हे तर संपूर्ण जिल्हा हादरला आहे. 
.

पानटपरी चालक असलेल्या राम मोहिते ( वय 28 वर्षे ) या तरुणाचा  सांजा चौकातील धीरज रामकृष्ण काशीद यांचे पानटपरी समोर शेतीच्या बांधाच्या वादातून गावातीलच पाच जणांनी बुधवारी रोजी दुपारी ३.१५ वाजण्याच्या सुमारास कोयता आणि कत्ती या धारदार शस्त्राने हात आणि पायावर वार करून निर्घृण हत्या केली. 

या मर्डर प्रकरणी आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये बुधवारी रात्री उशिरा दोन भाऊ आणि तीन जावई अश्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला, पैकी एकास पोलिसांनी अटक केली आहे.अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव नारायण डोंगरे असून, त्यास आज न्यायालयात उभे करण्यात आले असता, तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. आरोपीची बाजू ऍड. अमोल वरुडकर यांनी मांडली. आरोपीच्या चेहऱ्यावर कसलाही पश्चाताप दिसत नव्हता. 

मयत राम मोहिते आणि आरोपीमध्ये शेतीच्या बांधावरून मागील अनेक दिवसापासून वाद होता. एक महिन्यापूर्वी मोहिते याने आनंदनगर पोलिसात तक्रार दिली होती, पण पोलिसांनी आरोपीविरुद्ध कसलीही कारवाई केली नाही, पोलिसांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे त्याचे पर्यावसान मर्डरमध्ये झाले आहे.

धाराशिव शहरात गुंडगिरीचे सत्र वाढले असून, पोलिसांचा वचक संपल्याचे दिसून येत आहे. ते मोडीत काढण्याचे पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले आहे. शहरात मटका राजरोस सुरु आहे. गुटखा विक्री सुरु आहे. अवैध दारू विक्री सुरु आहे. पोलीस हप्ते गोळा करण्यात मग्न आहेत, त्यामुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे.

हे आहेत आरोपी

अक्षय पडवळ, सागर पडवळ, रणजित सुर्यवंशी, नारायण डोंगरे, काका सुर्यवंशी या सर्वांनी दि.26.04.2023 रोजी 15.00 वा. सु. सांजा चौकातील धीरज रामकृष्ण काशीद यांचे पानटपरी समोर उस्मानाबाद गावकरी- रामेश्वर किसन मोहिते, वय 28 वर्षे यांना मोटरसायकलवर येऊन कत्तीने व कोयत्याने वार करुन गंभीर जखमी करुन जिवे ठार मारले. अशा मजकुराच्या मयताचे भाऊ- पांडुरंग किसन मोहिते यांनी दि. 26.04.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 302, 143, 147, 148, 149 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

राम मोहिते मर्डर प्रकरणी भाऊ-  पांडुरंग किसन मोहिते ( रा. सांजा ) यांनी आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, अक्षय रामहरी पडवळ, सागर रामहरी पडवळ या सख्या भावाविरुद्ध तसेच रणजित सुभाष सूर्यवंशी, नारायण नागनाथ डोंगरे, काका चिवळादादा सूर्यवंशी ( सर्व रा. सांजा ) या पाच जणांविरुद्ध भादंवि ३०२,१४३,१४७,१४८,१४९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पैकी नारायण नागनाथ डोंगरे यास पोलिसांनी अटक केली असून, अक्षय रामहरी पडवळ, सागर रामहरी पडवळ ,रणजित सुभाष सूर्यवंशी, काका चिवळादादा सूर्यवंशी यांचा शोध पोलीस घेत आहेत.

From around the web