जळकोटमधून चोरी गेलेला वाळूचा ट्र्क कर्नाटकमध्ये जप्त 

 
s

उस्मानाबाद  : 6 ब्रास वाळू भरलेला ट्रक क्र. एम.एच. 13 आर 3459 हा दि. 07- 08.12.2021 रोजी दरम्यानच्या रात्री जळकोटवाडी (नळ), ता. तुळजापूर येथे रस्त्याकडेला उभा असतांना अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला होता. अशा मजकुराच्या पोलीस पाटील- देवीदास हरीदास चव्हाण यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत 405 / 2021 हा गुन्हा नोंदवला आहे.

            सदर गुन्हा तपासादरम्यान स्था.गु.शा. च्या पोनि- श्री. गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखालील सपोनि- श्री. मनोज निलंगेकर, पोहेकॉ- काझी, शेळके, कवडे, पोकॉ- ढगारे, ठाकूर, उंबरे यांच्या पथकास मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अफकपूर, जि. कलबुर्गी, राज्य- कर्नाटक येथील वकील शंकर चव्हाण यास ताब्यात घेउन त्याच्या ताब्यातून नमूद ट्रक जप्त केला आहे.  

 
गांजा या अंमली पदार्थाची अवैध वाहतुक करणाऱ्यावर गुन्हा दाखल

परंडा  : वांगी (खुर्द), ता. भुम येथील पांडुरंग बाबुराव टकले हे दि. 09.12.2021 रोजी 17.00 वा. सु. घारगाव शिवारातील जवळा ते परंडा रस्त्यावरुन टिव्हीएस मोटारसायकलवरुन गांजा या अंमली वनस्पतीची 4.060 कि.ग्रॅ. बिया, पाने, फुले असा पदार्थ अवैधरित्या वाहुन नेत असतांना परंडा पोलीसांच्या पथकास आढळले. यावरुन परंडा पो.ठा. चे सहायक पोलीस निरीक्षक-श्री. विक्रांत हिंगे यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम कलम- 20 (ब) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web