वाशीमध्ये एस. टी. कर्मचाऱ्यास मारहाण, गुन्हा दाखल 

 
crime

वाशी  : एस.टी.कॉलनी कळंब ता.कळंब येथील- लक्ष्मण आप्पाराव चपटे हे बस क्र. एम एच 20 बी एल 4111 वरती शासकीय कर्तव्यावर असताना विजय दत्ता उंदरे रा. वाशी ता.जि.वाशी यांनी अण्णपुर्णा मंगल कार्यालय जवळ बस मध्ये बसु दिले नाही म्हणुन या कारणावरुन दि.29.05.2023 रोजी 23.02 वा. दरम्यान यांना शासकीय कामात आडथळा आणुन, शिवीगाळ करुन, बुक्याने मारुन जखमी केले. अशा मजकुराच्या लक्ष्मण आप्पाराव चपटे यांनी दि.29.05.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 353,332,504 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

तामलवाडी  : काटी शिवारातील शेतात तामलवाडी ता. तुळजापुर येथील- 1. रमेश्वर पवार 2. लक्ष्मण पवार 3. अर्जुन राठोड 4. तुषार पवार 5. विशाल रामेश्वर पवार 6. बालाजी राठोड 7. सुभाष राठोड 8. राजु चव्हाण 9.महादेव चव्हाण 10. शंकर पवार या सर्वांनी शेतातुन पाईप लाईनचे कारणावरुन दि.28.05.2023 रोजी 22.00 वा. दरम्यान यांना शिवीगाळ करुन लोखंडी रॉडने, काठीने मारुन गंभीर जखमी केले. अशा मजकुराच्या नामदेव फत्तु राठोड यांनी दि.29.05.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 307, 323,324,504, 147,148,149 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

धाराशिव  : अंबेजवळगा तांडा येथील- 1. अविनाश राजेंद्र चव्हाण 2. राजेंद्र दगडु चव्हाण यांनी संगणमत करुन विनाकारण शिवीगाळ करुन या कारणावरुन दि.28.05.2023 रोजी 20.30 ते 21.00 वा चे दरम्यान यांना शिवीगाळ करुन डोक्यात तलवारीने मारुन जखमी गंभीर जखमी केले. अशा मजकुराच्या मनेश शेषेराव चव्हाण यांनी दि.29.05.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 327,324,323,504,34 सह 4/25 शस्त्र अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web