चेक न वठल्यामुळे रुईभरच्या कर्जदारास कोर्टात शिक्षा

 
s

उस्मानाबाद  - घेतलेल्या कर्जाची रक्कम वेळेत न भरता खोटा चेक देवून लोकमंगल मल्टीस्टेट को ऑप सोसायटीची फसवणूक केल्याप्रकरणी रुईभरच्या कर्जदारास दोन महिने कारावास आणि कर्जाची रक्कम भरण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. 

कर्जदार नामे पोपट गोरख पाडुळे रा. रुईभर ता. जि. उस्मानाबाद यांनी लोकमंगल मल्टीस्टेट को ऑप सोसायटी लि सोलापूर यांची शाखा उस्मानाबाद येथून कर्ज घेतले होते. सदर कर्ज वेळोवेळी व नियमित पणे हप्ते भरलेले नाही, त्यामुळे संस्थेने कर्ज रक्कम मागणीसाठी नोटीस दिली होती. त्यानंतर कर्जदार पोपट गोरख पाडुळे यांनी कर्ज रक्कम फेडीसाठी लोकमंगल संस्थेस न वटणारा चेक संस्थेस दिला होता. 

सदर चेक लोकमंगल संस्थेने वटण्यासाठी भरले असता न वटता परत आल्यामुळे लोकमंगल मल्टीस्टेट या संस्थेने कर्जदार पोपट गोरख पाडुळे यांच्या विरुद्ध निगोशिएबल इंस्ट्रूमेंट ॲक्ट नुसार कलम 138 अन्वये फिर्याद मे उस्मानाबाद कोर्टात दाखल केली होती. सदर फिर्यादीवर मे कोर्टाने चौकशी करून तसेच लोकमंगल मल्टीस्टेट संस्थेच्या वतीने सादर केलेल्या पुरावा ग्राह्य धरून कर्जदार पोपट गोरख पाडुळे यांना मे कोर्टाने निगोशिएबल इंस्ट्रूमेंट ॲक्ट नुसार 2 महिने कारावास तसेच रू. 1,43,656/- नुकसान भरपाई म्हणून चेक दिलेल्या तारखेपासून 9 टक्के वार्षिक व्याजदराने व्याज देण्याचा आदेश मे उस्मानाबाद कोर्टाने दिलेला आहे. तसेच कर्जदार पोपट गोरख पाडुळे यांनी सदर रक्कम भरण्यास असमर्थ झाल्यास 1 महिना वाढीव कारावासाची शिक्षा मे कोर्टाने दिली आहे.

From around the web