उस्मानाबादेत मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या महिला आणि तरुणीची छेड काढणाऱ्या रोडरोमियोला चोप  

महिलेच्या तक्रारीवरून शहर पोलीस स्टेशनमध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल
 
S

उस्मानाबाद - शहरातील जाधववाडी रोडवर सकाळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या महिला आणि तरुणीची छेड काढणाऱ्या एका रोडरोमियोला काही लोकांनी चोप देवून शहर पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर एका धाडसी महिलेच्या फिर्यादीवरून या रोडरोमियोविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. 


शहरातील जाधववाडी रोडवर अनेक महिला आणि तरुणी सकाळी  मॉर्निंग वॉकला जात असतात. यावेळी एक रोडरोमियो काही तरुणी आणि महिलांची छेड काढत होता. मंगळवारी सकाळी या रोडरोमियोने एका विवाहित महिलेची छेड काढली. 

सदर महिलेने हा प्रकार आपल्या पतीला सांगितला असता, आज सकाळी हा रोडरोमियो पुन्हा आला असता, काही लोकांनी त्यास चोप दिला. यावेळी त्याने आपले नाव सूरज गोवर्धन गायकवाड ( वय २२ ) असे सांगितले. तो भूम तालुक्यातील भोगलगावचा रहिवासी असून, तो उस्मानाबादेत आदर्शनगर मधील यशश्री क्लासेसच्या होस्टेलमध्ये राहून स्पर्धा परीक्षेची स्टडी करीत असल्याचे समजते .

मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या महिला आणि तरुणीचा पाठलाग करणे, त्यांना तू आवडतेस म्हणणे, मोबाईल नंबर मागणे असे उद्योग हा  रोडरोमियो करीत होता. एका महिलेच्या  तक्रारीनंतर शहर पोलीस स्टेशनमध्ये भादंवि कलम 354 ( A ) 354 ( D ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

From around the web