तुळजापूर तालुक्यात दरोडेखोरांचा उच्छाद

तिघांना जबर मारहाण ; एकाची प्रकृती चिंताजनक 
 
s

तुळजापूर - एकीकडे दिवाळीची तयारी सुरु असताना दुसरीकडे दरोडेखोरांनी उच्छाद मांडला आहे. तुळजापूर तालुक्यातील बारूळ गावातील वर्दळीच्या ठिकाणचे कापड दुकान फोडून दरोडेखोरांनी घरातील तिघांना जबर मारहाण करत सोन्याच्या दागिन्यांसह दोन लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना रविवारी (दि. ३१) मध्यरात्रीनंतर दोन वाजेच्या सुमारास घडली. मारहाण केलेल्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर सोलापूरला उपचार करण्यात येत आहेत.

बारूळ येथे राजेंद्र कस्तुरे यांचे घराशेजारीच कपड्याचे दुकान आहे. सध्या दिवाळीचा सण असल्याने ग्राहक अधिक येत असल्याने कस्तुरे यांनी दुकानात लाखो रुपयांचा कपडयांचा माल भरलेला होता. त्यांनी रोजच्या प्रमाणे शनिवारी रात्री साडेनऊला दुकान बंद करून आतमधील हाॅलमध्ये पत्नी, मुलगा, मुलगी रात्री साडेदहा ते ११ वाजता झोपले होते. सध्या राजेंद्र कस्तुरे यांच्या दुकानात वाढलेली गर्दी लक्षात घेऊन २० ते ३० वयोगटातील पाच जणांनी दरोडा टाकला. 


काठ्या व लोखंडी राॅड घेऊन दरोडेखोर आत आल्यानंतर कस्तुरे यांच्या पायाला चोरटयांचा स्पर्श झाला. कोण आहे, असे विचारताच समोर उभ्या टाकलेल्या चोरट्यांनी कस्तुरे यांच्या डोक्यावर काठीने मारहाण केली. गोंधळ एेकून पत्नी, मुलगा, मुलगी उठले. त्यांनाही चोरट्यांनी काठीने जबर मारहाण केली. कपाटातील रोख एक लाख पाच हजार सोन्याचे दागिने असे मिळून दोन लाख चार हजार रूपयांचा ऐवज लंपास केला. यामध्ये राजेंद्र कस्तुरे यांच्या हाताला गंभिर दुखापत झाल्याने त्यांना उस्मानाबादला प्राथमिक उपचार करून सोलापूरला हलवण्यात आले. तुळजापूर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाला.


घटनास्थळावर श्वानपथक पाचारण केल्यावर श्वान वस्तीच्या दिशेने २०० मीटरवर जावून घुटमळले. त्या ठिकाणी एक पर्स व पॉकेट हाती लागले आहे. पत्नी जयश्री कस्तुरे व मुलगा मन्मथ कस्तुरे किरकोळ जखमी असून त्यांच्यावर उस्मानाबाद जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. चोरट्यां

From around the web