चोरीस गेलेला माल मुळ मालकास परत

 
s

धाराशिव  - उस्मानाबाद जिल्ह्यात विविध पोलीस ठाण्यांतर्गत दाखल झालेल्या चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावून चोरीस गेलेला माल पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकां मार्फत जप्त केला जातो. व मुळ मालकास परत करण्याचा कार्यक्रम पोलीस अधीक्षक कार्यालयाचे सभागृह येथे घेण्यात आला. 

यात कळंब, येरमाळा, तुळजापूर, अंबी, मुरुम, बेंबळी  पोलीस स्टेशनच्या 12 गुन्ह्यातील मुद्देमाल ज्यात 60 ग्रॅम वजणाचे सुवर्ण दागिणे, 49 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिणे, मोटरसायकल असा एकुण 4,00,000 ₹ किंमतीचा मुद्देमाल पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते मुळ मालकास परत करण्यात आला.

s

         सदर कार्यक्रमास अप्पर पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, प्रो.डी.वाय.एस.पी. . गींताजली दुधाने, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक  यशवंत जाधव, पोलीस निरीक्षक- साबळे, सहय्यक पोलीस निरीक्षक पाटील, शिंदे, पोलीस अधीक्षक कार्यालय येथील अधिकारी अंमलदार तसेच 10 ते 15 मुळ मालक हे उपस्थित होते. 

चोरीचे दोन गुन्हे दाखल 

वाशी  : वाशी येथील- बालाजी अनंतराव भोसले यांची अंदाजे 95,000 ₹ किंमतीची स्प्लेंडर मोटरसायकल क्र एमएच 25 ए झेड 0485 ही दि.31.05.2023 रोजी 23.30  ते दि. 01.06.2023 रोजी 04.00 वा. दरम्यान भोसले यांच्या घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या बालाजी भोसले यांनी दि. 01.06.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
धाराशिव  :
अपसिंगा, ता. तुळजापूर येथील- अतुल सोमनाथ गोरे यांची अंदाजे 25,000 ₹ किंमतीची एच एफ डिलक्स मोटरसायकल क्र एमएच 25 ए ए 6143 ही दि.30.05.2023 रोजी 07.00 ते 08.00 वा. दरम्यान छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड आडत लाईन उस्मानाबाद येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या अतुल गोरे यांनी दि. 01.06.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

                                                                                                                             

From around the web