बेंबळीच्या अवैध कत्तल खान्यांवर छापा, ९ जनावरे ताब्यात
धाराशिव - बकरी ईद व आषाढी एकादशी सणाच्या पाश्र्वभुमीवर गोवंशीय जनावराची अवैध कत्तल व वाहतुक रोखण्यासाठी पोलिसांनी विशेष पथकाची स्थापना केली आहे. दि.28.06.2023 रोजी बेंबळी येथे अवैधरित्या गोवंशीय जनावरांची कत्तल चालू असल्याची गोपनीय माहिती पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना मिळाल्याने त्यांच्या आदेशावरुन विशेष पोलीस पथकाचे पोलीस निरीक्षक कानगुडे, यांच्या पथकाने दि. 28 जुन रोजी मध्य रात्री 01.30 वा. सु. बेंबळी गावातील जुना बोरखेडा येथे रवाना होउन पोलीस ठाणे बेंबळीचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे, पोलीस उप निरीक्षक माने, पोलीस अंमलदार कदम, तांबे यांच्या मदतीने अवैध कत्तल खान्यावर छापा टाकला.
सदर छापा कारवाई मध्ये जुना बोरखेडा रोड बेंबळी येथे राहणारा इसम नामे मकदुम गणी कुरेशी, वय 40 वर्षे, हा त्याचे स्वत:चे जागेत कंपाऊंडचे आतमध्ये एका बंद खोलीमध्ये 05 संशयीत गोवंशीय जनावरांची कातडी मिळून आली. तसेच सदर ठिकाणी जीवंत 2 गायी, 2 बैल, 3 रेडे, 2 रेडकु असे एकुण 9 जनावरे त्याच्या ताब्यात कत्तलीसाठी बांधलेले मिळुन आले. यावर पथकाने मिळून आलेले एकुण 9 जनावरे व गोवंशीय कातडी असा एकुण 1,78,000 ₹ किंमतीचे कातडी व जनावरे जप्त करुन प्रयोगशाळा परिक्षणाकरीता पशुधन विकास अधिकारी, बेंबळी डॉ. श्री. सुतार यांच्या मार्फत कातडीचे नमूने काढले आहेत. तसेच जप्त कातडी हा नाशवंत पदार्थ असल्याने तो नगरपरिषद बेंबळी यांच्या डंम्पींगच्या जागेत खड्ड्यात पुरुन नाश केले व जीवंत 2 गायी, 2 बैल, 3 रेडे, 2 रेडकु असे एकुण 09 जनावरे हे गो शाळेत देण्याची कार्यवाही केली आहे. या प्रकरणी पोलीस हावलदार- रामलिंग आडसुळ यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.द.सं. कलम 427,महाराष्ट्र प्राणि संरक्षण कायदा कलम- 5(ब), 5(क), 9 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पोलीस पथकाचे पोलीस निरीक्षक कानगुडे, पोलीस ठाणे बेंबळीचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक . योगेश शिंदे, पोलीस उप निरीक्षक माने, पोलीस अंमलदार कदम, तांबे पोलीस नियंत्रण कक्ष येथील पोलीस अगमलदार 684/ पवार, 700/लोंढे, 972/वाघमारे यांच्या पथकाने केली आहे.