धाराशिव शहरात जुगार अड्ड्यावर छापा 

दोन माजी नगरसेवकाच्या भावासह ९ जण सापडले 
 
crime

धाराशिव - शहरातील एका जुगार अड्ड्यावर आनंदनगर पोलिसांनी छापा मारून, तिरट नावाचा जुगार खेळणाऱ्या ९ लोकांना ताब्यात घेऊन, २४ लाख १७ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. जुगार खेळणाऱ्यामध्ये दोन माजी नगरसेवकांच्या भावाचा समावेश आहे. 

 अतुल कुलकर्णी, पोलीस अधिक्षक धाराशिव, यांचे आदेशाने व  नवनीत कॉवत अपर पोलीस अधिक्षक, धाराशिव यांचे मार्गदर्शनाखाली  उपविभागीय पोलीस अधिकारी  स्वप्नील राठोड यांचे आदेशावरुन पोलीस ठाणे आनंदनगर चे प्रभारी अधिकारी  बांगर हे पोलीस ठाणे आनंदनगर हद्दीत अवैध धंद्याची माहिती काढून कार्यवाही करत असताना दि.24.09.2023 रोजी गप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, छायादिप मंगल कार्यालयाचे पाठीमागील भागात प्रदीप आण्णासाहेब निंबाळकर यांचे राहते घरी बंद खोलीत धाराशिव येथे काही इसम तिरट नावाचे जुगार खेळत व खेळवित आहे सदर ठिकाणी 20.55 वा. सु छापा मारला असता.

      सदर ठिकाणी मिळून आलेले इसम नामे 1) स्वप्नील अनिल शिंदे,वय 21 वर्षे, 2) उमंग मधुकर निंबाळकर, वय 50 वर्षे, 3) दिनेश भानुदास काकडे, वय 52 वर्षे, 4)संदीप नानासाहेब पवार,वय 40 वर्षे, 5)अझरोद्दीन खयामोद्दीन शेख वय 36 वर्षे, 6)सरुराज मकसुद कुरेशी, वय 29 वर्षे, 7)अजय राम नरवडे, 8)प्रदीप आण्‌णासाहेब निंबाळकर, 9) आमन करीम शेख,वय 19 वर्षे हे सर्व लोक तिरट जुगार खेळत असताना पथकास मिळुन आले. नमूद जुगार अड्ड्यावरुन तिरट जुगाराचे  साहित्यासह  मोबाईल फोन, चारचाकी वाहन, मोटरसायकल व रोख रक्कम असा एकुण 24,17,530 ₹ किं चा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला असुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 4,5 अंतर्गत आनंदनगर पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.

     सदरची कामगिरी पोलीस अधीक्षकअतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षीक  नवनीत कॉवत यांच्या आदेशावरुन उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील राठोड, आनंदनगर  पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी  बांगर, सपोनि शिंदे, चव्हाण, खरड, माळी पोलीस हावलदार- 1157/ माने, 1126 शेंडगे, 1229 हांगे, 765/ शेख, महिला पोलीस हावलदार-897/ नदाफ पोलीस नाईक-1152 बांगर, 1291 बांगर पोलीस अंमलदार 40 कागदे, महिला पोलीस अंमलदार 776/ शिंदे तसेच उपविभागीय कार्यालयातील पोलीस हावलदार 896 गरड, पोलीस अमंलदार-1867 सय्यद यांच्या पथकाने केली आहे.

From around the web