पाडोळी प्राथमिक आरोग्य केंद्रात राडा 

परिचारीका रुग्णवाहिका चालकास शिवीगाळ करून मारहाण 
 
Osmanabad police

बेंबळी  : प्राथमिक आरोग्य केंद्र, पाडोळी येथील परिचारीका- संगीता शेटे व रुग्णवाहिका चालक- नितीन घोडके हे दि. 21.12.2021 रोजी 09.30 वा. सु. कर्तव्यावर होते. यावेळी पाडोळी ग्रामस्थ- शिवाजी सुगन कांबळे, वाघा माणिक गायकवाड, बंडू अशोक कांबळे, शंकर सुगन कांबळे, कुंडलिक मिसाळ, लखन कांबळे या सर्वांनी त्यांच्या नातेवाईकास आरोग्य केंद्रावर उपचारार्थ नेउन मोठमोठ्याने आरडाओरड करुन नितीन घोडके यांना शिवीगाळ करुन मारहान केली. तसेच संगीता शेटे यांसह त्यांच्या सहकाऱ्यांस उध्दटपने बोलून त्यांच्या शासकीय कामात जाणीवपुर्वक अडथळा निर्माण केला. यावरुन प्राथमिक आरोग्य केंद्र कर्मचारी- बालाजी शेरखाने यांनी सरकारतर्फे दि. 22 डिसेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 353, 332, 186, 143, 147, 149, 323, 504 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

मारहाणीचे तीन गुन्हे दाखल 

भूम : भुम येथील विजय बाराते यांसह त्यांचा भाचा असे दोघे दि. 18.12.2021 रोजी 01.30 वा. सु. गावकरी- दत्ता उत्तम हुकुडे यांना त्यांच्या पार्डी रोड येथील शेतात शिवीगाळ करत होते. यावर हुकुडे यांनी त्यांचा जाब विचारला असता नमूद दोघांनी हुकुडे यांना ठार मारण्याची धमकी देउन लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहन केली. या मारहानीत हुकुडे यांच्या डाव्या हाताची दोन बोडे तुटल्याने ते गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या दत्ता हुकुडे यांनी दि. 22 डिसेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 325, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

कळंब  : जनावरांचा चारा कापल्याच्या कारणावरुन तांदुळवाडी, ता. कळंब येथील- परमेश्वर नारायण कोल्हे, प्रविण कोल्हे, शोभा कोल्हे यांनी दि. 21.12.2021 रोजी 17.30 वा. सु. भाऊबंद- एकनाथ मधुकर कोल्हे व रंजना या दोघा पती- पत्नीस शिवीगाळ, धक्काबुक्की केली. तसेच. तसेच काठीने मारहान करुन जखमी करुन ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या एकनाथ कोल्हे यांनी दि. 22 डिसेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 325, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

वाशी  : ब्रम्हगाव, ता. वाशी येथील लाला बिसरा शिंदे हे दि. 18.12.2021 रोजी 17.00 वा.सु. आपल्या कुटंबीयांसह घरात होते. यावेळी लाखनगाव, ता. वाशी येथील सर्जेराव शिंदे, रघु शिंदे, भिमा शिंदे यांसह पारा येथील- मच्छिंद्र शिंदे, महादु शिंदे व नाना काळे या सर्वांनी जुन्या वादाच्या कारणावरुन लाला शिंदे यांहस त्यांच्या कुटूंबीयांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, कुऱ्हाडीच्या तुंब्याने, दगड, काठीने मारहान करुन जखमी केले. तसेच लाला यांच्या घरातल्या पेटीतील 20,000 ₹ सर्जेराव शिंदे हे घेउन गेले. अशा मजकुराच्या लाला शिंदे यांनी दि. 22 डिसेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 143, 147, 148, 149, 452, 327, 324, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web