बनावट कागदपत्रे तयार करून प्लॉटची खरेदीखत 

वाशी पोलीस स्टेशनमध्ये सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल 
 
crime

 वाशी  : फिर्यादी नामे- प्रविण राजेंद्र तावरे, वय 43 वर्षे, रा. पिंपळगाव लिंगी ता. वाशी जि. धाराशिव यांचे दि. 19.05.2023 रोजी दुय्यम निबंधक कार्यालय वाशी येथे  आरोपी नामे- प्रभु निवृत्ती माळी, वय 73 वर्षे, 2) रामलिंग अंकुश माळी, वय 50 वर्षे, 3) वंदना सुहास कवडे, वय 39 वर्षे, 4)संतोष संदीपान गायकवाड वय 50 वर्षे,5) प्रदिप वामनराव कवडे, वय 35 वर्षे, 6) काकासाहेब रंगा उंदरे, वय 70 वर्षे, रा. वाशी ता. वाशी जि. धाराशिव यांनी फिर्यादीचे कब्जातील मौजे वाशी येथील भु.क्र 241/ब मधील 00 हे 25 आर मधील पुर्व पश्चिम पुर्व रुंदी 25 फुट व दक्षिण उत्तर लांबी 35 फुट असलेल्या प्लॉटचे नमुद आरोपीनी बनावट कागदपत्रे बनवून  खरेदीखत करुन फिर्यादीची फसवणुक केली.अशा मजकुराच्या फिर्यादी प्रविण तावरे यांनी दि.26.09.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम-120(ब),420,  463, 464, 465, 468, 471, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

मोटारसायकलची चोरी 

 तुळजापूर  : फिर्यादी नामे- अतुल सतीष वाघमारे, वय 25 वर्षे, रा. पांडुरंग नगर, तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव यांची अंदाजे 38,000₹ किंमतीची हिरो होंडा मोटरसायकल एमएच 14 एचएल 0115 ही दि.26.09.2023 रोजी 13.25 ते 13.30 वा. सु. सुनिल प्लाझा समोरील बसस्थानक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक जाणारे रोडवर तुळजापूर येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी अतुल वाघामारे यांनी दि.26.09.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम-379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

From around the web