उस्मानाबादेत पुजाऱ्यास मारहाण 

 
Osmanabad police

उस्मानाबाद  : उस्मानाबाद येथील स्वामी समर्थ मंदीरात दि. 02.01.2022 रोजी 19.30 वा. सु. गावातीलच दोन तरुणांनी पादत्राने घालून मंदीरात प्रवेश करुन पुजारी- संतोष कुलकर्णी यांना प्रसादाची मागणी केली. यावर कुलकर्णी यांनी त्यांस पादत्राणांबाबत हटकले असता त्या दोघांनी कुलकर्णी यांना चापटा मारुन व मंदीरात मोडतोड करुन कुलकर्णी यांच्या धार्मीक भावना दुखावल्या. अशा मजकुराच्या संतोष कुलकर्णी यांनी दि. 03 जानेवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 295, 323, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उमरगा  : गुंजोटी येथील अकबर मुजावर हे दि. 02.01.2022 रोजी 05.30 वा. सु. गावातील मैदानात उभे होते. यावेळी कदेर तांडा येथील ग्रामस्थ- जेठालाल जाधव, विनोद जाधव, सुनिल राठोड यांसह अन्य 10 – 12 लोकांनी जुन्या वादातून मुजावर यांना ठार मारण्याची धमकी देउन शिवीगाळ केली. तसेच गज, तलवार, चाबूक, काठीने मारहान करुन किरकोळ जखमी केले. अशा मजकुराच्या अकबर मुजावर यांनी दि. 03 जानेवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 134, 147, 148, 149, 324, 504, 506 सह शस्त्र कायदा कलम- 4, 27 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

जिल्ह्यात दोन अपघात 

बेंबळी  : पाडोळी, ता. उस्मानाबाद येथील दिलीप प्रेमराज गुंड, वय 62 वर्षे हे दि. 30.12.2021 रोजी 22.30 वा. सु. गावातील पेट्रोलियम विक्री केंद्रासमोरील रस्त्याने मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एयू 5495 ही चालवत जात होते. यावेळी अज्ञात चालकाने पिकअप वाहन क्र. एम.एच. 25 पी 5649 हा निष्काळजीपने चालवल्याने गुंड यांच्या मो.सा. ला धडकल्याने ते गंभीर जखमी झाले. या अपघातानंतर नमूद पिकअपचा अज्ञात चालक अपघात स्थळावरुन वाहनासह पसार झाला. अशा मजकुराच्या दिलीप गुंड यांनी दि. 03.01.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 सह मो.वा.का. कलम- 184, 134 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

मुरुम : चालक- सचिन सुरेश सलगन, रा. जेवळी (उत्तर), ता. लोहारा यांनी दि. 29.11.2021 रोजी 11.30 वा. सु. भोसगा शिवारातील रस्त्यावर मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एयू 8091 ही निष्काळजीपने चालवल्याने समोरुन येणाऱ्या टिव्हीएस मो.सा. क्र. एम.एच. 25 एएफ 5179 ला धडकली. या अपघातात टिव्हीएस मो.सा. चालक- बबलू हिरामण आडे हे गंभीर जखमी झाले तर मो.सा. वर त्यांच्या पाठीमागे बसलेले अरबाज दस्तगिर बेग हे मयत झाले. अशा मजकुराच्या बबलू आडे यांचे चुलते- बालाजी मानू आडे, रा. जेवळी पश्चिम तांडा, ता. लोहारा यांनी दि. 03.01.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web