उस्मानाबादेतील जनावरांच्या अवैध कत्तलखान्यावर पोलिसांचा छापा
उस्मानाबाद - शहरातील खिरणीमळा येथे मागील अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या जनावरांच्या अवैध कत्तलखान्यावर पोलिसांनी छापा मारून तीन टेम्पोसह मुद्देमाल जप्त केला आहे तसेच तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वीही या ठिकाणी छापा मारूनही अवैध कत्तलखाना सुरु असल्याने आरोपीविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.
शहरातील खिरणीमळा येथे गाय ,म्हशी, आणि बैलांची अनाधिकृतरीत्या कत्तल होत असल्याची गोपणीय माहिती मिळाल्यावरुन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशाने सहा पोलीस अधीक्षक उपविभाग काळंब एम. रमेश यांनी दोन पथके तयार करुन याठिकाणी छापा मारला,यावेळी ताजे मांस,कातडे, वाळलेले मांस, वाहतुक करणारे तीन टेम्पो आढळून आले.पोलीसांनी तीन टेम्पो,गोवंश मांस व तीन जिवंत जनावरे असा एकुण 26,77,500 ₹ मुद्देमाल जप्त करून तीन आरोपीविरुध्द कलम 279, 283, 188 भा.द.सं सह कलम 5 क 9 (अ) महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमाप्रमाणे पोलीस ठाणे उस्मानाबाद शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला आहे.
उस्मानाबाद जिल्हा हद्दीत अवैध धंद्याची माहिती काढून उस्मानाबाद शहरातील खिरणीमळा कळंब उपविभागाचे दोन पथके तयार करुन उस्मानाबाद येथे छापे मारले. उस्मानाबाद शहरातील फकीरा चौकाजवळ वैराग रोडवर एक आयशर टेम्पो वाहन चालकासह धरुन टेम्पोची तपासणी केली असता सदर टेम्पो मध्ये गोवंश मांस आढळून आले. टेम्पो मधील मांस कोठून आणले असे विचारले असता जलील कुरैशी यांच्या कत्त्लखान्यातील असल्याचे सांगितले,
टेम्पो चालकाने दिलेल्या माहितीवरून पोलिसांचे दोन्ही पथक, पोलीस मुख्यालय उस्मानाबाद येथील RCP] QRT पथक व पोलीस ठाणे उस्मानाबाद शहर पोनि उस्मान शेख व पोलीस स्टाफ सह दि.16.02.2023 रोजी 17.00 वा. सु. खिरणीमळा खाटीक गल्ली येथील कत्तलखान्यात छापा मारला असता तेथे कापण्यासाठी लागणारे साहित्य व बाजूस असलेल्या वाहनामध्ये मांस असे आढळून आले.
या कारवाईत एकुण 3 टेम्पो- 19,00,000 ₹ गांवेश मांस-7,57,500 ₹, 3 जिवंत गांवंशी जनावरे 20,000 ₹ असे एकुण 26,77,500 ₹ रुपयाचे मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे. व 03 आरोपी विरुध्द कलम 279, 283, 188 भा.द.सं सह कलम 5 क 9 (अ) महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमाप्रमाणे पोलीस ठाणे उस्मानाबाद शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशाने सहाय्यक पोलीस अधीक्षक उपविभाग काळंब सोबत उपविभाग कळंब एम.रमेश, उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक- उस्मान शेख, सपेनि- काबंळे, पठाण,चव्हाण पोउपनि- पुजरवाड, चाटे, पोलीस ठाणे स्टाफसह यांनी केली आहे.