चोराखळीजवळील गौरी कलाकेंद्रावर पोलिसांचा छापा 

२७ नृत्यांगणांसह ३६ पुरुषांना अटक आणि सुटका 
 
Osmanabad police

येरमाळा : चोराखळीजवळील गौरी कलाकेंद्रात कोरोना नियमाचे उल्लंघन करून रात्री दीड वाजता धांगडधिंगा  सुरु होता.  कळंबच्या उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्यासह पोलीस पथकाने या कलाकेंद्रावर छापा मारून  २७ नृत्यांगणांसह ३६ पुरुषांना अटक  केली आणि त्यांची जामिनावर सुटका केली आहे. 


सध्या कोविड- 19 च्या ओमायक्रोन प्रसारास प्रतिबंध होण्यासाठी जिल्हाधिकारी, उस्मानाबाद यांनी रात्री 09.00 ते सकाळी 06.00 या कालावधीत 5 पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास मनाई केली आहे. 

या पार्श्वभुमीवर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, कळंब येथील पथक दि. 30.12.2021 रोजी 01.30 वा. सु. वडगाव शिवारात रात्रगस्तीस असतांना त्यांनी गौरी कलाकेंद्रास भेट दिली. यावेळी कलाकेंद्र मालक- मनसुर नुर शेख, रा. लातूर यांनी कलाकेंद्रात 27 नृत्यांगणांसह 36 पुरुष एकत्र जमवून नृत्यांगणा नृत्याद्वारे अश्लिल, बिभत्स हावभाव करत असल्याचे आढळले. 

तर सुरज राजेश निकाळजे, रा. जामखेड हे तेथे मद्यपुरवठा करत असल्याचे आढळले. यावरुन उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, कळंब येथील पोलीस उपनिरीक्षक- श्री. अमोल मालुसरे यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 188, 268, 269, 294, 34 आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम- 33, 131 सह साथीचे रोग अधिनियम कलम- 3 व महाराष्ट्र मद्य निषेध कायदा कलम- 65 (ई) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web