धाराशिव शहर पोलीस स्टेशनमधील पोलीस चतुर्भुज
धाराशिव - धाराशिव पोलीस दलातील एका लाचखोर पोलिसाला १२ हजाराची लाच घेताना एसीबी पथकाने रंगेहात पकडून गुन्हा दाखल केला आहे.
गुटखा व तंबाखूचा व्यवसाय सुरू करू देणे कामी व तक्रारदारावर कोणतीही कारवाई न करण्यासाठी महादेव वसंतराव शिंदे ,वय- 45 वर्षे, पद- पोलीस हवालदार, धाराशिव शहर पोलीस स्टेशन यांनी तक्रारदार यांचेकडून 15,000 रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती 12,000 रुपये लाच रक्कम लागलीच स्वीकारण्याचे मान्य करून पंच साक्षीदारा समक्ष स्वीकारताना ताब्यात घेण्यात आले आहे.
हा सापळा पोलीस उपाधीक्षक सिद्धराम म्हेत्रे यांच्या मागदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विकास राठोड, पोलीस अमलदार मधुकर जाधव , आशिष पाटील, विशाल डोके यांनी रचला आहे.
लोकसेवक अथवा त्यांच्या वतीने कोणी खाजगी व्यक्ती कायदेशीर काम करून देण्यासाठी लाचेची मागणी करत असेल तर खालील नंबरवर संपर्क साधावा
कार्यालय 02472 222879 टोल फ्री क्रमांक.1064