सराटीमध्ये दारूवर छापेमारी करणाऱ्या पोलिसाना मारहाण 

 
crime

नळदुर्ग: आरोपी नामे-संभाजी ऊर्फ पोपट गेनबा गायकवाड, 2) राजश्री संभाजी उर्फ  पोपट गायकवाड, ज्योती आनंदा गायकवाड सर्व रा. सराटी, ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद  हेदि. 17.07.2023 रोजी 16.00 वा. सु. भिम नगर सराटी येथे विनापास परवाना विदेशी, देशी व गाहभ दारु व पेट्रोल उदृश पदार्थ मिळून आल्याने त्याचा राग मनात धरुन संभाजी गायकवाड, राजेश्री गायकवाड व ज्योती गायकवाड यांनी  फिर्यादी नामे-महेश महादेव माने, वय 29 वर्षे. पोलीस अंमलदार 1891 ने पोलीस मुख्यालय उस्मानाबाद व पोलीस स्टाप यांना विरोध करुन शिवीगाळ करुन फिर्यादीस व पथकातील अधिकारी व अंमलदार यांना लाथाबुक्यांनी मारहान केली.  व शासकीय कामात अडथळा निर्माण केला. अशा मजकुराच्या महेश महादेव माने पोलीस अंमलदार 1891 ने पोलीस मुख्यालय उस्मानाबाद यांनी दि.17.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 353, 332, 504, 34 सह मदाका 65 (ई), अत्यावश्यक वस्तु अधि कलम 3, 7 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.  

मारहाणीचे आणखी दोन गुन्हे दाखल 

नळदुर्ग  :फिर्यादी नामे- पिंकी शैल्या शिंदे, वय 35 वर्षे रा. निलेगाव, ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद यांना दि.17.07.2023 रोजी निलेगाव येथे आरोपी नामे- सागर जयराम भोसले व अन्य 2 रा. पारधी वस्ती मोर्डा ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद यांनी पत्नीस मारहाण केल्याचे कारणावरुन संगणमताने शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगडाने मारहान केली. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या पिंकी शिंदे यांनी दि.17.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम-  324, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


तामलवाडी  : आरोपी नामे-1)सखुबाई कानगुडे, रा. वानेवाडी ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद, अनिता शेंडगे रा. हिंगणी, ता. बार्शी 3)वनिता आलाट रा वैराग ता. बार्शी 4) बालाजी कानगुडे, 5) मोहन कानगुडे  दोघे रा. वाणेवाडी, ता. तुळजापूर 6) शुभम आलाट रा. वैराग, ता. बार्शी जि. सोलापूर या सर्वांनी नालीचे पाणी आढवल्याचे  कारणावरून दि.16.07.2023 रोजी 11.00 वा. सु. वाणेवाडी शिवार येथे फिर्यादी नामे- मेघा धनंजय वळशिंगे, वय 27, रा. वाणेवाडी, ता. तुळजापूर  जि. उस्मानाबाद यांना संगणमत करुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यंनी काठीने मारहाण केली. तसेच मेघा यांचे सासु सासरे मेघाच्या बचावास आले असता  त्यासही शिवीगाळ करुन काठीने मारहाण केली. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या मेघा वळसिंगे यांनी दि.17.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 452, 324, 323, 504, 143, 147,148, 149 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
 

From around the web