उस्मानाबाद शहरात मटक्याविरुद्ध पोलिसांची धडक कारवाई 

 
Osmanabad police

उस्मानाबाद  : जुगार चालू असल्याच्या गोपनीय खबरेवरुन उस्मानाबाद जिल्हा पोलीसांनी दि. 08 ऑक्टोबर रोजी 4 वेगवेगळ्या ठिकाणी छापे मारुन जुगार साहित्यासह एकुण 25,130 ₹ रोख रक्कम ज प्त करुन संबंधीत 7 व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अंतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यात 4 गुन्हे नोंदवले आहेत.

१) अझर शेख, रा. उस्मानाबाद हे शहरातील बसस्थानकासमोरील त्यांच्या पानटपरीत कल्याण मटका जुगार चालवण्याचे साहित्य व 2,170 ₹ रोख रक्कम बाळगलेले आनंदनगर पोलीसांना आढळले.

२) युवराज डुकरे, रा. सांजा, ता. उस्मानाबाद हे चिखली फाटा येथील आवटे यांच्या गाळ्यासमोर कल्याण मटका जुगार चालवण्याचे साहित्य व 1,080 ₹ रोख रक्कम बाळगलेले स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास आढळले.

३) महेबुब आत्तार, रा. डिकसळ, ता. कळंब हे होळकर चौक, कळंब येथील एका चायनीज दुकानासमोर कल्याण मटका जुगार चालवण्याचे साहित्य व 740 ₹ रोख रक्कम बाळगलेले कळंब पोलीसांना आढळले.

४) लहु पवार, संजय काळे, अर्जुन पवार, बिरुदेव पवार, सर्व रा. भुम हे शहरातील विश्वकर्मा मंदीराजवळ तिरट जुगार खेळत असतांना जुगार साहित्य व 21,140 ₹ रोख रक्कम बाळगलेले भुम पोलीसांना आढळले.

 
अवैध मद्य विरोधी कारवाई

उस्मानाबाद  : ‍अवैध मद्य विक्री विरोधी उस्मानाबाद जिल्हा पोलीसांनी काल दि. 08 ऑक्टोबर रोजी 8 ठिकाणी छापे मारुन देशी- विदेशी दारुच्या एकुण 107 बाटल्या मद्य, 28 लि. गावठी मद्य व 20 लि. शिंदी अंमलीद्रव्य जप्त करुन संबंधीत 8 व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य निषेध काद्यांतर्गत खालील प्रमाणे 8 गुन्हे नोंदवले आहेत.

1) उस्मानाबाद (ग्रा.) पोलीसांनी बावी शिवारात छापा मारला असता ग्रामस्थ- कृष्णाथ कुंभार हे गावातील खामसवाडी रस्त्यालगतच्या एका टपरीसमोर देशी दारुच्या 19 बाटल्या बाळगलेले तर दुसऱ्या घटनेत सारोळा येथील छाप्यात ग्रामस्थ- पपीता काळे या पत्रा शेडमध्ये 18 लि. गावठी दारु बाळगलेल्या आढळल्या.

2) परंडा पोलीसांनी परंडा शहरात छापा मारला आसता हर्षवर्धन संपत निरवणे हे परंडा येथील करमाळा रस्त्यालगतच्या हॉटेलजवळ देशी दारुच्या 22 बाटल्या बाळगलेले आढळले.

3) येरमाळा पोलीसांनी शेलगांव येथे छापा मारला असता ग्रामस्थ- गौतम सोनवणे हे आपल्या राहत्या घरासमोर देशी दारुच्या 7 बाटल्या बाळगलेले आढळले.

4) उस्मानाबाद (श.) पोलीसांनी अण्णा भाऊ साठे नगर परिसरात छापा मारला असता संगिता काळे या आपल्या राहत्या घरासमोर 20 लि. शिदी अंमलीद्रव्य बाळगलेल्या आढळल्या.

5) वाशी पोलीसांनी वाशी शिवारात छापा मारला असता ग्रामस्थ- अजय जगताप हे जनसेवा ढाब्यामध्ये देशी- विदेशी दारुच्या 19 बाटल्या बाळगलेले आढळले.

6) बेंबळी पोलीसांनी समुद्रवाणी तांडा येथे छापा मारला असता ग्रामस्थ- रमणाबाई पवार या आपल्या राहत्या घरासमोर 10 लि. गावठी दारु बाळगलेल्या आढळल्या.

7) लोहारा पोलीसांनी पेठसांगवी येथे छापा मारला असता ग्रामस्थ- चंदु राठोड हे आपल्या राहत्या घरासमोर देशी दारुच्या 40 बाटल्या बाळगलेले आढळले.

From around the web