धाराशिवमध्ये पोलीस आणि लाईनमनला धक्काबुक्की, गुन्हा दाखल 

 
crime

धाराशिव  : उस्मानाबाद  ग्रामीण पोलीस ठाणे येथील- अशोक शेषेराव कांबळे  यांना दि.01.06.2023 रोजी 17.40 वा. सु. डायल 112 वर कॉल आल्याने ते तक्रारदार यांचे मदतीसाठी घाटंग्री येथे शासकीय काम करत असताना  घांटग्री , ता. उस्मानाबाद येथील- युवराज उत्तम बिचकुले  यांनी  अशोक यांच्याशी हुज्जत घालून, अरेरावीची, असभ्य भाषा करुन वाद घालून काठीने, घेउन अंगावर आला. शासकिय काम पार पाडण्यास अडथळा निर्माण केला.  तुमच्या नावाने आत्महात्या करतो अशी धमकी दिली. यावरुन उस्मानाबाद ग्रामीण पोलीस ठाणेचे- पोलीस अंमलदार अशोक कांबळे यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 353, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

धाराशिव  : गणेश नगर, उस्मानाबाद येथील- वरिष्ठ तंत्रज्ञ लाईनमन- उमाकांत निळकंठ क्षिरसागर हे दि 01.06.2023 रोजी 15.18 ते 16.30 वा. सु. चर्च उस्मानाबाद व महावितरण कार्यालय उस्मानाबाद येथे उमाकांत  हे डिपीचा फ्युज टाकण्यासाठी गेले असता तांबरी विभाग उस्मानाबाद येथील- बालाजी भारत थिटे हे डीपीला दगड मारत असताना उमाकांत हे डिपीवर दगड का मारतो असे बोलण्यास गेले त्यावर बालाजी यांनी उमाकांत यांच्याशी हुज्जत घालून, अरेरावीची, असभ्य भाषा करुन वाद घालून. शासकिय काम पार पाडण्यास अडथळा निर्माण केला. यावरुन विजयकुमार उमाकांत क्षिरसागर यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 353, 332, 507, 504 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web