पवन राजे खून प्रकरण : डॉ. पद्मसिंह पाटील अखेर न्यायालयात हजर 

माफीचा साक्षीदार पारसमल जैन याने ओळख पटवून दिली 
 
s
उस्मानाबाद जिल्ह्यातील लोकांच्या निकालाकडे डोळा 

मुंबई   -  मुंबई सत्र न्यायालयात पवन राजेनिंबाळकर खून खटल्याची सुनावणी सुरु आहे. १३ ऑक्टोंबर रोजी .डॉ. पद्मसिंह पाटील अखेर हजर झाले. यावेळी माफीचा साक्षीदार झालेल्या पारसमल जैन याने डॉ. पद्मसिंह पाटील यांची ओळख पटवून दिली. त्यामुळे या खून खटल्याच्या निकालाकडे लक्ष वेधले आहे. 

राजकीय वैमनस्यातून  ३ जून २००६ रोजी पवनराजे निंबाळकर यांचा कळंबोली येथील खुन झाला होता. या प्रकरणी डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या सह इतर ९ जनांवर सीबीआय मार्फत गुन्हा दाखल होवून दोषारोप पत्रही दाखल झाले आहे. सदर खटला मुंबई येथील सत्र न्यायालयात चालू आहे.

सदर प्रकरणातील आरोपी पारसमल  जैन याने न्यायालयात माफीचा साक्षीदार म्हणुन साक्ष देण्यासाठी अर्ज सादर केला होता. सदरचा अर्ज न्यायालयाने मंजुर केल्यानंतर मागील बऱ्याच तारखेपासून सदर माफीचा साक्षीदार पारसमल जैन यांची मुंबईतील सत्र न्यायालयात साक्ष नोंदवण्यात आली. त्यानुसार ६ ऑक्टोंबर २०२१ रोजी सदर खटल्यामध्ये तारीख नेमलेली होती. सदर दिवशी सदर माफीचा साक्षीदार पारसमल जैन यांनी सर्व आरोपींची  ओळख न्यायालयास पटवून दिली. परंतु त्यावेळी डॉ. पद्मसिंह पाटील हे गैरहजर होते. त्यांच्या वकीलांनी डॉ. पद्मसिंह पाटील आजारी असल्याचे कारण पुढे करत ते खटल्यात हजर राहू शकत नाहीत. त्यामुळे मुदत मागीतली होती.अखेर  १३ ऑक्टोंबर रोजी डॉ. पाटील न्यायालयात हजर झाले होते. 

दिनांक 13/10/2021 रोजी मुंबई सत्र न्यायालयात सीबीआय विरुद्ध डॉक्टर पद्मसिंह पाटील व इतर या स्व.पवनराजे निंबाळकर व समद शेख या दुहेरी खून खटल्यातील प्रकरणात आरोपी क्रमांक चार पारसमल जैन याने यापूर्वीच न्यायालयाकडे माफीचा साक्षीदार होणे असले बाबत विनंती अर्ज केला होता व सदरचा अर्ज मंजूर झाल्यानंतर मागील महिन्यापासून माफीचा साक्षीदार पारसमल जैन यांची साक्ष न्यायालयात नोंदणी चालू होती त्यावेळी त्याने स्व. पवनराजे निंबाळकर यांचा खून केल्याचे कबूल करून सदर कटात डॉक्टर पद्मसिंह पाटील, सतीश मंदाडे, मोहन शुक्ला इत्यादी आरोपी यांचे संबंध त्याच्यासोबत कसे आले होते हे कोर्टासमोर सांगितलं तसेच सदर केसमध्ये खूना संदर्भात झालेला घटनाक्रम जशास तसा कोर्टासमोर उलगडून सांगितला. 

त्यानंतर सदर साक्ष नोंदविण्याच्या शेवटच्या भागात सदर पारसमल जैन यांच्याशी ज्या आरोपींचा संबंध आला त्यांची ओळख पटवण्यासाठी मागील तारखेस डॉक्टर पद्मसिंह पाटील वगळता इतर आरोपींची ओळख न्यायालयास पटवून दिली होती त्यावेळी डॉक्टर पद्मसिंह पाटील हजर नव्हते म्हणून न्यायालयाने आज 13/10/2021 रोजी डॉक्टर पद्मसिंह पाटील यांना न्यायालयात हजर राहण्याबाबत आदेश केल्यानुसार आज डॉक्टर पद्मसिंह पाटील न्यायालयात हजर झाले असता आरोपी पारसमल जैन याने डॉक्टर पद्मसिंह पाटील यांची ओळख न्यायालयास पटवून दिली व सदर माफीचा साक्षीदार आरोपी पारसमल जैन यांची सीबीआयच्या वतीने सर तपासाची साक्ष नोंदणी संपली. सदर माफीचा साक्षीदार पारसमल जैन याचा उलट तपास आरोपींच्या वतीने घेण्यासाठी पुढील तारीख 26/10/2021 नेमलेली आहे. त्यामुळे सदर प्रकरण उत्तरार्धकडे चालले असून लवकरच निर्णय होईल याची शक्यता आहे. 

सदर प्रकरणात सीबीआयच्या वतीने विशेष सरकारी वकील एजाज खान प्रकरणातील फिर्यादी निंबाळकर कुटुंबियांच्या वतीने ॲड. पांडुरंग गवाड व ॲड. रमेश मुंढे हे काम पाहत आहेत.

From around the web