पाटोदा : दहावी पास झाला म्हणून पार्टी मागितली तर मिळाला लाथाबुक्याचा प्रसाद 

 
crime

 बेंबळी : पाटोदा, ता. उस्मानाबाद येथील- बलभिम महादेव ढोले, वय- 44वर्षे हे दि. 09.06.2023 रोजी 16.00 वा. सु. पाटोदा चौकात अस स्टॅन्ड जवळ वडाचे झाडाखली थांबले होते. यावेळी गावकरी- प्रकाश किसन गायकवाड यांनी तेथे जाउन तुझ्या भावाचा मुलगा दहावी पास झाला मला पार्टी दे त्यावर बलभिम म्हणाले  पार्टी कशाला पेडे घे असे बोलण्याचे कारणावरुन प्रकाश यांनी बलभिम यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगडाने गुडघ्यावर मारुन गुडघा फॅक्चर केला. ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या बलभिम ढोले यांनी दि. 27.06.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 326, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

दाबका  : कारच्या धडकेत मोटारसायकलस्वार ठार 

उमरगा  : दाबका, ता. उमरगा येथील-हरीदास भगवान शिंदे हे दि.20.06.2023 रोजी 19.00 वा. सु. ड्युटीसाठी उमरगा येथे मोटरसायकल वरुन जात होते. दाबका पेट्रोल पंपासमोर रोडवर इरटिगा कार क्र एमएच 25 आर 8471 च्या चालकाने त्याचे ताब्यातील कार ही हायगई व निष्काळजी पणे अतीवेगाने चालवून हरीदास यांचे मोटरसायकलला पाठीमागून धडक दिली. या आपघातात हरीदास  यांना गंभीर मार लागून ते मयत झाले. या अपघातानंतर नमूद कार चालक अपघात स्थळावरुन वाहनासह पसार झाला. अशा मजकुराच्या मयताचा मुलगा नामे- कैलास हरीदास शिंदे यांनी दि.27.06.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) सह मो.वा. का. कलम 184, 134 (अ) (ब) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

धाराशिवमध्ये चोरी 

धाराशिव  :चिखली, ता. उस्मानाबाद येथील- विश्वनाथ भागवत जाधवर, वय 65 वर्ष हे दि.27.06.2023 रोजी 14.00 ते 14.30 वा.दरम्यान अनोळखी एक इसम विश्वनाथ यांना लिप्ट मागून गाडीवर बसून जात होते. दरम्यान  बसस्थानक ते बेंबळी कॉर्नर ( धाराशिव )  येथे अनोळखी इसमाने विश्वनाथ यांचे गळ्यातील बदामसह 20 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन अंदाजे 70,000 ₹ किंमतीची चोरुन नेली. अशा मजकुराच्या विश्वनाथ जाधवर यांनी दि.27.06.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web