परंडा :  करणी केल्याचे कारणावरुन वांगी गावात दोन गटात हाणामारी 

 
crime

परंडा  : करणी केल्याचे कारणावरुन आरोपी नामे- 1)दिलीप लक्ष्मण पवार, 2)बाबुराव दिगंबर पवार,3) लक्ष्मण दिगंबर पवार, 4) मारुती दिगंबर पवार, 5) शहाजी मारुती पवार, 6) ताईबाई बाबुराव पवार, 7)रकमाबाई मारुती पवार, 8) संगिता लक्ष्मण पवार, 9) अर्जुन शहाजी पवार सर्व रा. वांगी खु, ता. भुम जि. उस्मानाबाद यांनी फिर्यादी नामे-पोपट शंकर पवार वय 38 वर्षे यांना करणी केल्याचे कारणावरुन दि.14.07.2023 रोजी 06.30 वा. सु. मारुती दिगंबर पवार यांचे घरासमोर वांगी खु, ता. भुम येथे जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने आरोपी मारुती पवार व शाहजी पवार यांनी फिर्यादीचे वडील शंकर पवार यांना दगडाने मारहान केली.  

आरोपी नामे दिलीप पवार, बाबुराव पवार, लक्ष्मण पवार यांनी फिर्यादी नामे पोपट पवार यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्यानी, तलवारीने वार करुन गंभीर जखमी केले. तसेच पोपट पवार यांचे भाउ नामे पंडीत पवार, हे पोपट पवार  यांचे बचावास आले असता त्यासही दिलीप पवार व बाबुराव पवार यांनी चाकुने व तलवारीने पोटावर व पाठीवर वार करुन गंभीर जखमी केले. पत्नी रेखा पवार, आई फुलाबाई पवार यांना ही लाथाबुक्यांनी मारहाण केली. अशा मजकुराच्या पोपट पवार यांनी दि.14.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन परंडा पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम-307, 326, 324, 323, 504, 506, 143, 147, 148, 149 सह शस्त्र अधि  कलम 4/25 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

परस्पर विरोधी तक्रार 

आरोपी नामे- शंकर गोविंद पवार, 2) पंडीत शंकर पवार, 3) पोपट शंकर पवार, 4) संदीप पोपट पवार, 5) फुलाबाई शंकर पवार, 6) रेखा पोपट पवार सर्व रा. वांगी खुर्द, ता. भुम, जि. उस्मानाबाद यांनी करणी करण्याचे कारणावरुन फिर्यादी नामे रकमाबाई मारुती पवार, वय 48 वर्षे, यांचे पती मारुती पवार व दिर बाबुराव पवार या दोघांना आरोपी शंकर पवार, पंडीत पवार व पोपट पवार यांनी काठीने व दगडाने मारहान केली. तसेच आरोपी नामे संदीप यांने खोऱ्याने पाठीत व डोक्यात मारुन गंभीर जखमी केले. आरोपी नामे रेखा पवार व फुलाबाई पवार यांनी फिर्यादी यांना शिवीगाळ करुन केसाला धरुन खाली पाडुन मारहान केली. जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या रकमाबाई पवार यांनी दि.14.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन परंडा पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम-326, 324, 323, 504, 506, 143, 147, 148, 149 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

सापावरून मारहाण 

 उमरगा : आरोपी नामे- 1) युवा गायकवाड,2) आकाश नांगरे, 3) सोनु लंगडे  तिघे रा. उमरगा, ता. उमरगा जि. उस्मानाबाद यांनी  दि.14.07.2023 रोजी  16.00 वा. सु. उपविभागीय अधिकारी कार्यालय परिसरात उमरगा येथे साप खेळवित असताना फिर्यादी नामे- वसीम रसुल शेख, वय 38 वर्षे रा. जुने तहसील कॉर्टर, उमरगा, ता.उमरगा जि. उस्मानाबाद यांनी आरोपी यांना माझी मुलगी सापाला भेति आहे. तुम्ही दुर जावून साप खेळवा असे म्हाणाले असता आरोपी यांनी संगणमत करुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण केली. तर आरोपी नामे युवा गायकवाड यांने फिर्यादीचे हातावर काठीने मारहाण करुन गंभीर जखमी केले. अशा मजकुराच्या वसीम शेख यांनी दि. 14.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम-326, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे

From around the web