परंडा :  घरफोडीतील दोन चोरटे मुद्देमालासह अटक 

 
Osmanabad police

उस्मानाबाद  : रात्रीच्या वेळी घरफोडी करुन घरातील 1,06,200 ₹ रक्कम चोरुन नेल्याने परंडा पो.ठा. गु.र.क्र. 13 / 2020 हा भा.दं.सं. कलम- 457, 380 नुसार नोंदवण्यात आला आहे. तपासादरम्यान स्था.गु.शा. च्या पोनि- गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखालील पोउपनि- श्री. माने, पोहेकॉ- काझी, पोना- सय्यद, चव्हाण, पोकॉ- कोळी, आरसेवाड, मारलापल्ले यांच्या पथकाने गुन्ह्याच्या शैलीचा अभ्यास केला. 

यातून हा गुन्हा भुम येथील आरसोली रस्ता परिसरात राहणाऱ्या गणेश व सतिष मच्छिंद्र काळे या दोघा भावांनी केला असल्याचे निषपन्न झाले.  यावर पथकाने आज दि. 20 सप्टेंबर रोजी त्या दोघांस ताब्यात घेतले असता नमूद गुन्ह्यातील चोरीच्या रकमेतून त्यांनी मोटारसायकल खरेदी केली असल्याचे समजले. यावर पथकाने ती मोटारसायकल जप्त करुन नमूद दोघांना परंडा पो.ठा. च्या ताब्यात दिले आहे.

मारहाण 

उस्मानाबाद  : रोहित जाधव, देवा कोळी, दाघे रा. शिंगोली, ता. उस्मानाबाद यांनी पुर्वीच्या भांडणाच्या कारणावरुन दि. 18 सप्टेंबर रोजी 18.00 वा. सु. शिंगोली येथील एका पानस्टॉलसमोर उस्मानाबाद येथील संकेत सतीश बागल यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, दगडाने मारहान करुन जखमी केले. अशा मजकुराच्या संकेत बागल यांनी दि. 19 सप्टेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web