परंडा : 17 वर्षापासुन पाहिजे असलेला आरोपी अटकेत

 
d

परंडा  : वडगांव (नळी), ता. भुम येथील भावड्या उध्दव काळे याचा  भुम पो.ठा. गु.र.क्र. 37 / 2004 मध्ये सहभाग असल्याने पोलीस त्याचा शोध घेत असल्याने गेली 17 वर्षे तो पोलीसांना हुलकावनी देत होता. गोपनीय माहिती आधारे परंडा पो. ठा. च्या पोनि- श्री. सुनिल गीड्डे यांच्या मार्गदर्शनाखालील पोहेकॉ- कळसाईन, पोना- घोळवे, पोकॉ- कोळेकर, सय्यद यांच्या पथकाने त्यास आज दि. 03 सप्टेंबर रोजी भुम तालुक्यातून ताब्यात घेतले आहे.

सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकपने वाहन उभा करणाऱ्यावर गुन्हा दाखल

परंडा : नागनाथ बिभीषण थोरबोले, रा. परंडा यांनी दि. 02 सप्टेंबर रोजी 17.00 वा. सु. त्यांचे बोलेरो वाहन क्र. एम.एच. 25 आर 5575 हे परंडा न्यायालयाच्या प्रवेशद्वारसमोर रहदारीस धोकादायकरित्या उभा करुन भा.दं.सं. कलम- 283 चे उल्लंघन केले. यावरुन परंडा पो.ठा. चे आण्णासाहेब लोमटे यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन गुन्हा नोंदवला आहे.

From around the web