उस्मानाबाद : अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ

 
Osmanabad police

उस्मानाबाद : एका तरुणाने गावात राहनाऱ्या नात्यातीलच एका 16 वर्षीय मुलीशी (नाव- गाव गोपनीय) मे 2020 पासून वेळोवेळी जवळीक साधून तीच्यासोबतच्या लैंगीक संबंधांचे चोरुन छायाचित्रिकरण केले. हे छायाचित्रण त्या मुलीच्या माता- पित्यांस दाखवून त्यांना बदनामीची भीती घालून त्याने मुलीचा विवाह आपल्यासोबत लावण्यास त्यांना भाग पाडले. या विवाहानंतर त्या मुलीस तीच्या सासु- सासऱ्यांनी वेळोवेळी शारिरीक- मानसिक त्रास दिला. तर त्या तरुणाने त्या मुलीसोबतच्या (पत्नी) लैंगीक संबंधांचे छायाचित्रण तीच्या वडील व भाऊ यांना व्हाट्सॲपद्वारे पाठवले. अशा मजकुराच्या पिडीत मुलीने दि. 11 नोव्हेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 376, 506 सह पोक्सो कायदा कलम- 4, 8, 12 तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा कलम- 66, 67 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
जिल्ह्यात दोन अपघात 
 

तुळजापूर : तोरंबा, ता. उस्मानाबाद येथील लखन रामहरी गायकवाड यांनी दि. 16.10.2021 रोजी 20.00 वा. सु. काक्रंबा गावाजवळील तुळजापूर- औसा रस्त्यावर मोटारसायकल निष्काळजीपने चालवल्याने रस्त्याबाजूस उभ्‌या असलेल्या शोभा रोहीदास साळुंके व सोजराबाई बाबुराव साळुंके, दोघी रा. लातुर या दोघा बहिणींना मोटारसायकल  पाठीमागून  धडकली. या अपघातात सोजराबाई या मयत होउन शोभा साळुंके या गंभीर जखमी झाल्या. अशा मजकुराच्या शोभा साळुंके यांनी दि. 11.11.2021 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ), 337, 338 सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

तामलवाडी : चालक- केशव नातु म्हैत्रे, रा. तामलवाडी यांनी दि. 09.11.2021 रोजी 18.25 वा. सु. सुरतगाव येथील राष्ट्रीय महामार्ग क्र. 52 वर ॲपे मॅजीक वाहन क्र. एम.एच. 25 पी 5884 निष्काळजीपने चालवून रस्त्याने पायी जाणाऱ्या अंदोज 55 वर्षे वयाच्या अनोळख्या महिलेस धडक दिल्याने ती महिला मयत झाली. यावरुन तामलवाडी पो.ठा. चे पोलीस हेडकॉन्स्टेबल- गोरोबा गाढवे यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web