उस्मानाबाद : त्यांनी ओटीपी सांगताच बँक खात्यातून सव्वा लाख रुपये कपात
उस्मानाबाद : “मी आयसीआयसीआय बँक ग्राहक सेवा केंद्रातून बोलत असून तुमच्या क्रेडीट कार्डवर प्रोटेक्शन प्लॅन ॲक्टीव झाल्याने तुम्हाला वार्षीक 2,499 ₹ दंड लागेल. तो बंद करण्यासाठी तुमच्या क्रेडीट कार्ड वरील 16 अंक सांगा.” असा एका अनोळखी फोन क्रमांकावरुन कॉल नितीन अजिनाथ तुपसमिंदर, रा. सांजा रोड, उस्मानाबाद यांना दि. 23.11.2021 रोजी 18.00 वा. आला. यावर तुपसमिंदर यांनी काही एक विचार नकरता आपल्या क्रेडीट कार्डवरील 16 अंकी क्रमांक त्या कॉलवरील समोरील व्यक्तीस सांगीतला असता तुपसमिंदर यांच्या भ्रमणध्वनीवर ओटीपीचा संदेश आला. त्या संदेशातील मजकूर समजून न घेता तुपसमिंदर यांनी त्यातील ओटीपी त्या समोरील व्यक्तीस सांगीतला असता त्यांच्या बँक खात्यातून 62,075 ₹ रक्कम कपात झाली. थोड्या वेळाने पुन्हा दुसरा ओटीपी संदेश आला असता तोही ओटीपी त्या समोरील व्यक्तीस सांगताच त्यांच्या खात्यातील 53,284 ₹ कपात झाले. अशा प्रकारे दोन व्यवहारात एकुण 1,15359 ₹ रक्कम कपात झाली. अशा मजकुराच्या नितीन तुपसमिंदर यांनी दि. 29 नोव्हेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 420 सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम- 66 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
दुसऱ्या घटनेत सकनेवाडी, ता. उस्मानाबाद ग्रामस्थ- सुभाष गेनदेव चव्हाण हे दि. 27.11.2021 रोजी 11.00 वा. सु. उस्मानाबाद बस स्थानकाजवळील एचडीएफसी एटीएम केंद्रामध्ये डेबिट कार्डद्वारे पैसे काढत होते. यावेळी त्यांना पैसे काढण्यास 2 पुरुषांनी मदतीचा बहाना करुन चव्हाण यांचा गोपनीय पासवर्डही बघून घेतला व त्यांचे डेबिटकार्ड घेउन त्यांना त्याच रंगसंगतीचे दुसरे डेबिट कार्ड दिले. यानंतर काही कालावधीनंतर चव्हाण यांना त्यांच्या बँक खात्यातून 25,500 ₹ रक्कम कपातीचा बँकेचा लघु संदेश प्राप्त झाला. अशा मजकुराच्या सुभाष चव्हाण यांनी दि. 29 नोव्हेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 420 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
चोरीच्या तीन घटना
उस्मानाबाद : पळसवाडी, ता. उस्मानाबाद येथील सचिन आबासाहेब कोळगे हे आपल्या कुटूंबीयांसह दि. 24- 27.11.2021 दरम्यान बाहेर गावी गेले होते. दरम्यानच्या काळात त्यांच्या घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने तोडून घरात प्रवश करुन कपाटातील सोने- चांदीचे दागिने व 10,000 ₹ रक्कम तसेच ग्रामस्थ- तोळाबाई कोळगे यांच्याही घरातील 6,000 ₹ रक्कम चोरुन नेली. अशा मजकुराच्या सचिन कोळगे यांनी दि. 29 नोव्हेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
येरमाळा : बरमावाडी, ता. कळंब येथील अभिमन्यु बाबुराव कदम यांच्या घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि.28- 29.11.2021 दरम्यानच्या रात्री तोडून घरात प्रवेश करुन कपाटातील 30 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिने व 47,000 ₹ रक्कम चोरुन नेली. अशा मजकुराच्या अभिमन्यु कदम यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
परंडा : परंडा येथील कनिष्क भारत गॅस एजन्सी चे नोकर मयुर रामचंद्र चव्हाण, रा. डोमगाव यांनी दि. 29.11.2021 रोजी 17.42 वा. सु. एजन्सी कार्यालयातील टेबलच्या ड्रॅावरमधील 8,000 ₹ रक्कम चोरुन नेल्याचे कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले. यावरुन गॅस एजन्सी व्यवस्थापक- दिलीप निकाळजे यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 381 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.