उस्मानाबाद : लोकसेवकास धाकदपटशा करणाऱ्यावर गुन्हा दाखल

 
Osmanabad police

उस्मानाबाद  : गावसूद येथील मंदिरासमोर दि. 16.11.2021 रोजी 19.30 वा. ग्रामसभा सुरू होती. यावेळी ग्रामस्थ- शाम तेरकर, संपत गायकवाड, सुधीर गायकवाड, प्रदीप तेरकर, अजय तेरकर, आकाश तेरकर, संतोष भोसले, सोमेश्वर तेरकर, महेश तेरकर या 8 व्यक्तींनी तंटामुक्ती अध्यक्षाच्या निवडीवरुन सभेत गोंधळ घालून ग्रामसभा घेण्यास संरपंच- श्रीमती महानंदा सगर यांना मज्जाव केला. यावर सरपंच- सगर यांनी ग्रामसेवकास सभा तहकुब करण्यास सांगीतले परंतु ग्रामसेवकाने सभा तहकुब केली नाही. यानंतर नमूद लोकांनी उपसरपंच- श्रीमती मंगल भोसले, पंच- लता पेठे यांसह ग्रामस्थ- गणेश सगर यांना धक्काबुक्की, शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिली. अशा प्रकारे नमूद लोकांनी सरपंचाच्या शासकीय कर्तव्यात जाणीवपुर्वक अडथळा आणला. अशा मजकुराच्या सरपंच- श्रीमती महानंदा सगर यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 143, 147, 149, 186, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

जिल्ह्यात दोन अपघात 

तुळजापूर  : रायखेल ग्रामस्थ- बापू किसन दांगट, वय 40 वर्षे हे दि. 02.11.2021 रोजी गावातील रस्त्याबाजूस उभे होते. यावेळी नळदुर्ग येथील नजीर शेख याने मो.सा. क्र. एम.एच. 25 एटी 6923 ही निष्काळजीपने चालवल्याने त्या मो.सा. ची धडक दांगट यांना बसल्याने ते गंभीर जखमी होउन मयत झाले. या अपघातानंतर जखमीस उपचारकामी न नेता, अपघाताची खबर नजीकच्या पोलीस ठाण्यास न देता नमूद चालक वाहनासह अपघात स्थळावरुन पसार झाला. अशा मजकुराच्या मयताचे पिता- किसन दांगट यांनी दि. 17 नोव्हेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184, 134 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

बेंबळी  - ग्रामस्थ- भिमराव वरपे यांनी चुमीच्या दिशेने मो.सा. चालवून शेख यांच्या मो.सा. ला समोरुन धडक दिल्याने शेख यांसह त्यांची पत्नी, मुलगी तसेच धडक देणारे वरपे असे चौघे गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या मलीक शेख यांनी दि. 17.11.2021 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337 सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web