उस्मानाबाद : हरवलेले 26 स्मार्टफोन मुळ मालकांस परत

 
w

उस्मानाबाद  : हरवलेल्या, चोरीस गेलेल्या भ्रमणध्वनींचा निरंतर ऑनलाईन शोध उस्मानाबाद पोलीस दलाच्या ‘तांत्रिक विश्लेषन कक्ष’ (TAW) च्या पोउपनि- अनिल किरवाडे, पाकॉ- सुनिल मोरे, अरविंद ढेकणे, विठ्ठल गरड, व्हंदरगुंडे यांचे पथक घेत असते. या शोध मोहिमेतून प्राप्त झालेले भ्रमणध्वनी उस्मानाबाद पोलीसांनी यापुर्वी संबंधीतांना अनेकदा परत केले आहेत.

अशाच प्रकरणांत ऑनलाईन देखरेख करत असता हरवलेले 26 स्मार्टफोन अन्यत्र वापरात असल्याचे तांत्रिक विश्लेषन कक्षास समजताच त्यांनी त्या स्मार्टफोन वापरकर्त्यांची माहिती उपलब्ध करुन दिली. 

या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोनि-  गजानन घाडगे यांसह सपोनि- निलंगेकर, पवार, पोउपनि- माने यांच्या पथकाने त्या 26 स्मार्टफोन वापरकर्त्यांशी संपर्क साधून ते स्मार्टफोन जप्त केले. ते स्मार्टफोन आज दि. 27.10.2021 रोजी पोलीस मुख्यालयात  पोलीस अधीक्षक श्रीमती नीवा जैन व अपर पोलीस अधीक्षक  नवनित कांवत यांच्या हस्ते परत करण्यात आले. स्मार्टफोन परत मिळाल्याने या प्रसंगी फोन मालकांनी पोलीस दलाचे आभार व्यक्त केले

From around the web