कलदेव निंबाळाजवळ ॲपे रिक्षा पलटी झाल्याने एक महिला ठार तर एक महिला जखमी
मुरुम : सालेगाव कलदेव निंबाळा शिवारात बाबु मुदगडे यांचे शेताजवळ ता.लोहारा येथील- शकुंतलाबाई प्रल्हाद भालेकर व शारदाबाई हणमंत भालेकर हे पॅजो रिक्षा क्र एम एच 25 एम 1282 वरुन बसुन सालेगावकडे येत असताना दि.18.04.2023 रोजी 11.30 वा दरम्यान सालेगाव शिवार ते सालेगाव जाणारे रोडवर पॅजो रिक्षा क्र एम एच 25 एम 1282 च्या चालकाने त्याच्या ताब्यातील पॅजो ॲपे रिक्षा ही हायगई व निष्काळजी पणे चालवल्याने शकुंतलाबाई व शारदाबाई हे खाली पडल्या व या आपघातात शकुंतलाबाई हे गंभीर जखमी होऊन मयत झाले. तर शारदाबाई हे गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या – माधव रंगराव यादव यांनी दि.12.05.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338,304 (अ) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
शिराळा येथे हाणामारी
परंडा : शिराळा, ता. परंडा येथील- 1.सुभाष मारुती चोधरी 2.मनिषा सुभाष चौधरी 3. रविंद्र सुभाष चौधरी या सर्वजणांनी शिराळा शिवारातील शेत गट नं 36 मध्ये मौजे शिराळा येथे परस्पर रस्ता करत असल्याचे व मुरुम टाकत असल्याने दिसल्याने फिर्यादी त्रिशला हनुमंत चौधरी यांनी मुरुम टाकु नका असे म्हणाले असता दि.02.05.2023 रोजी 17.00 वा. दरम्यान शिराळा शिवारातील गावकरी – त्रिशला चौधरी यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, मारहान करुन जखमी केले. अशा मजकुराच्या त्रिशला चौधरी यांनी दि.12.05.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 325,324,323,504,506,34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.