परंडा तालुक्यात अपघातात एक ठार 

 
crime

परंडा  : अनगरे, ता. श्रीगोंदा येथील-गुलचंद तालमन नगरे हे दि.17.06.2023 रोजी 19.00 वा. सु. आवार पिंपरी शिवारातील उल्फा नदीचे पुलाजवळ वळणावर उभे होते. दरम्यान मोटरसायकल क्र एमएच 25 एक्स 1024 च्या चालकाने त्यांचे ताब्यातील मोटरसायकल ही हायगई व निष्काळजी पणे अतीवेगाने चालवून गुलचंद यांना धडक दिली. या आपघातात गुलचंद हे गंभीर जखमी होऊन मयत झाले. 

या अपघातानंतर नमूद मोटरसायकल चालक अपघात स्थळावरुन वाहनासह पसार झाला.अशा मजकुराच्या नानासाहेब शंकर मुंगसे, रा. वाघेगव्हाण, ता. परंडा यांनी दि.03.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338, 304 (अ) सह मो.वा. का. कलम 184, 134 (अ) (ब) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

मारहाण 

नळदुर्ग  : अणदुर, ता. तुळजापूर येथील- बाबा अजिज शेख यांनी दि.01.07.2023 रोजी 08.10 वा.सु. लहुजी चौक अणदुर येथे गावकरी- शाहरुख अमिर आकडे यांचे भाउ अरबाज व आत्याचा मुलगा असरार यांनी रस्त्यात आडवून शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी, लोखंडी पाईपने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या शाहरुख आकडे यांनी दि.02.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरून भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 143, 147, 148, 149  अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 चोरीचे दोन गुन्हे दाखल 

धाराशिव  : कुरणेनगर, उस्मानाबाद येथील- संदीप धर्मराज राउत, वय 36 वर्ष, यांचे कुबेर बिअर बार चे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि.01.07.2023 रोजी 23.00 ते दि.02.07.2023 रोजी 06.00 वा. सुमारास तोडून आत प्रवेश करुन कांउटर मधील रोख रक्कम 17,500व करंडे एजन्सीज किराणा दुकानातील रोख रक्कम 14,000 असा एकुण 31,500 किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या संदीप राउत यांनी दि.03.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457,380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

नळदुर्ग :व्यासनगर, नळदुर्ग येथील- शंकर जानाजी भळे, वय 42 वर्ष, यांचे दि. 02.07.2023 रोजी 24.00 ते दि 03.07.2023 रेाजी 06.30 वा. सु शिवराज कॉम्पलेक्स जवळील महादेव मंदीर जवळ नळदुर्ग येथे उभी केलेल्या ट्रक क्र एमएच 42 टी 9993 डिझेल टाकीतील अंदाजे 21,837 ₹ किंमतीचे 250 लिटर  अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या शंकर भाळे यांनी दि.03.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web