तेरखेडयाजवळ अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एकाचा मृत्यू
येरमाळा - तेरखेडा, ता. वाशी येथील- सतिश बाजीराव घोलप वय 46 वर्षे, हे दि.25.04.2023 रोजी 19.30 वा. सु. तेरखेडा शिवारात समाधान ढाब्यासमोर धुळे ते सोलापूर जाणारे रोडवर मोटरसायकल क्र एमएच 25 एबी 5133 वरुन जात होते. दरम्यान अज्ञात वाहन चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन हे भरधाव वेगात हायगई व निष्काळजीपणे चालवुन सतिश यांचे मोटरसायकलला पाठीमागून धडक दिली. या अपघातात सतिश हे गंभीर जखमी होउन मयत झाले.
या अपघातानंतर नमूद अज्ञात वाहन चालक अपघात स्थळावरुन वाहनासह पसार झाला. अशा मजकुराच्या सागर मारुती घोलप यांनी दि.23.05.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ), सह मो. वा. कायदा कलम 184, 185 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
फसवणूक
कळंब : कळंब, ता. कळंब येथील- सतिषचंद्र भगवानदास लोढा यांनी आपल्य मालकीची जुनी मालमत्ता क्र 485,478/ अ,487/ब व नवीन मालमत्ता क्र 645/1ज्याचे क्षेत्र 8866 चौ फुट 824 चौ. मी जागेचा मालकी हक्क नसतानाही व 8 अ उतारा व मालमत्ता पत्रक समाधान यांचे नावाचे असल्याचे भासवुन पैसे घेऊन समाधान यांची फसवणुक केली. यावरुन समाधान बाबुराव कानडे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 420, 464 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.