उस्मानाबाद जिल्ह्यात दोन अपघातात एक ठार, दोन जखमी
उस्मानाबाद : समर्थनगर, उस्मानाबाद येथील शाहाबुद्दीन बागवान हे दि. 18.12.2021 रोजी 21.00 वा. सु. उस्मानाबाद बस स्थानकासमोरील आपल्या फळगाड्यासमोर थांबले असतांना अज्ञात चालकाने मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एपी 1610 ही निष्काळजीपने चालवल्याने शाहाबुदीन यांना धडकून ते गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या बागवान यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
तुळजापूर : चालक- निखील बालाजी माने यांनी दि. 11.12.2021 रोजी 20.30 वा.सु. तुळजापूर - बार्शी रस्त्यावरील खंडोबा मंदीराजवळ मोटारसायकल क्र. एम.एच. 16 एएफ 2306 ही निष्काळजीपने चालवल्याने समोरुन येणाऱ्या मो.सा. क्र. एम.एच. 25 एयु 1517 हिस धडकली. या अपघातात समोरील मो.सा. चालक- सलीम आमिन शेख, रा. सांगवी (काटी) हे गंभीर जखमी झाले तर मो.सा.वर पाटीमागे बसलेले त्यांचे सासरे- बाबुलाल उस्मान शेख, वय 78 रा. हे मयत झाले. अशा मजकुराच्या सलीम शेख यांनी दि. 19 डिसेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.