उस्मानाबाद जिल्ह्यात तीन अपघातात एक ठार, दोन जखमी 

 
Osmanabad police

उमरगा  : भीमनगर, उस्मानाबाद येथील मंगल गणपत गायकवाड, वय 50 वर्षे या दि. 16.12.2021 रोजी 16.00 वा. सु. जकेकुर येथील रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी होउन मयत झाल्या. या अपघातानंतर अज्ञात वाहन चालक अपघात स्थळावरुन वाहनासह पसार झाला. अशा मजकुराच्या मयतेची बहिण- अनिता दिगंबर माटे, रा. जकेकुर यांनी दि. 18 डिसेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 134 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

लोहारा  : चालक- दगडू सखाराम चव्हाण, रा. सत्तरधरवाडी, ता. औसा, जि. लातूर यांनी दि. 17.12.2021 रोजी 02.00 वा. सु. साखर कारखाना, समुद्राळ येथे ट्रॅक्टर क्र. एम.एच. 25 एएस 3780 हा निष्काळजीपने चालवल्याने जिवन महादेव राठोड, वय 14 वर्षे, रा. राजेगाव, ता. लोहारा यास धडकला. या अपघातात जिवन याचा डाव्या पायाचे हाड मोडून तो गंभीर जखमी झाला. अशा मजकुराच्या जिवनचे पिता- महादेव लक्ष्मण राठोड यांनी दि. 18 डिसेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

येरमाळा : तेरखेडा, ता. वाशी येथील बाळासाहेब जालिंदर शिंदे यांच्यासोबत ग्रामस्थ- अनिल काटे हे दि. 20.11.2021 रोजी 20.00 वा. सु. तेरखेडा येथील राष्ट्रीय महामार्ग क्र. 52 ने मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एबी 8034 ने प्रवास करत होते. यावेळी ट्रक क्र. के.ए. 29 – 9249 ने त्यांच्या मो.सा. ला पाठीमागून दिलेल्या धडकेत ते दोघे किरकाळे व गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या बाळासाहेब शिंदे यांनी दि. 18 डिसेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद ट्रकच्या अज्ञात चालकाविरुध्द भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

धोकादायकपणे वाहन चालवणाऱ्यावर गुन्हा दाखल

येरमाळा : नरेंद्र जमदाडे, रा. येरमाळा यांनी दि. 18.12.2021 रोजी 13.30 वा. सु. आपल्या ताब्यातील वाहन हे येरमाळा येथील सार्वजनिक रस्त्यावर निष्काळजीपने, भरधाव वेगात चालवून भा.दं.सं. कलम- 279 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द गुन्हा नोंदवला आहे.

From around the web