उस्मानाबाद जिल्ह्यात तीन अपघातात एक ठार, दोन जखमी 

 
Osmanabad police

येरमाळा : विनायक जयदेव उमरदंड, वय 28 वर्षे, रा. तेरखेडा, ता. वाशी हे दि. 02 ऑक्टोबर रोजी 12.30 वा. सु. तेरखेडा येथील रस्त्याने मोटारसायकल क्र. एम.एच. 15 सीएच 5765 ने प्रवास करत होते. दरम्यान उमरदंड यांच्या समोरील कार क्र. एम.एच. 12 आरवाय 3570 च्या चालकाने कार निष्काळजीपने रस्त्यावर उभा करुन अचानक कारचा दवाजा उघडल्याने उमरदंड यांची मो.सा. त्या दरवाजास धडकली. 

या अपघातात उमरदंड हे गंभीर जखमी होउन वैद्यकीय उपचारादरम्यान मयत झाले. अपघातानंतर नमूद कारचा अज्ञात चालक जखमीस वैद्यकीय उपचाराची तजबीज न करता, अपघाताची खबर नजीकच्या पोलीस ठाण्यास न देता वाहनासह अपघात स्थळावरुन पसार झाला. अशा मजकुराच्या सुरज उमाकांत उमरदंड, रा. तेरखेडा यांनी दि. 16 ऑक्टोबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184, 134 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
उमरगा  : ज्ञानेश्वर विलाय रणखांब, रा तोरंबा, ता. लोहारा हे दि. 11 ऑक्टोबर रोजी 16.00 वा. सु. माडज पाटी येथील रस्त्याने पायी जात होते. दरम्यान अज्ञात चालकाने मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एपी 7949 ही निष्काळजीपने चालवून रणखांब यांना पाठीमागून धडक दिल्याने ते खाली पडून त्यांच्या उजव्या हाताची बोटे मो.सा. च्या पचाकात अडकून बोटे तुटून गंभीर जखमी झाले. या अपघातानंतर नमूद मो.सा. चा आज्ञात चालक जखमीस उपचारकामी न नेता, अपघाताची खबर नजीकच्या पोलीस ठाण्यास न देाता वाहनासह अपघात स्थळावरुन पसार झाला. अशा मजकुराच्या ज्ञानेश्वर रणखांब यांनी दि. 16 ऑक्टोबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 सह मो.वा.का. कलम- 184, 134 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

            दुसऱ्या घटनेत अज्ञात चालकाने दि. 04 ऑक्टोबर रोजी 14.30 वा. सु. कसगीवाडी पाटी येथील रस्त्यार कार क्र. एम.एच. 25 आर 4288 ही चुकीच्या दिशेने निष्काळजीपने चालवून समोरुन येणाऱ्या मो.सा. क्र. एम.एच. 13 एएस 6203 ला धडक दिली. या अपघातात मो.सा. चालक- रमेश कांबळे, रा. आळंद, जि. गुलबर्गा यांच्या उजव्या पायाचे हाड मोडले. अशा मजकुराच्या रमेश कांबळे यांनी दि. 16 ऑक्टोबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web