उस्मानाबाद जिल्ह्यात अपघातात एक ठार , दोन जखमी  

 
Osmanabad police

तुळजापूर  : चालक- अंकुश शशिकांत चोपडे, रा. तिल्लेहाळ, ता. सोलापूर (दक्षिण) यांनी दि. 25.12.2021 रोजी 17.00 वा. सु. सिंदफळ शिवारातील राष्ट्रीय महामार्ग क्र. 52 वर बोलेरो पिकअप वाहन क्र. एम.एच. 13 सीजे 1548 हे निष्काळजीपने चालवल्याने धारासुर तांडा, ता. गंगाखेड, जि. परभणी येथील ईश्वर बाबुराव राठोड, वय 35 वर्षे हे चालवत असलेल्या मोटारसायकलला समोरुन धडकले. या अपघातात ईश्वर राठोड हे गंभीर जखमी होउन मयत झाले. अशा मजकुराच्या मयताचा भाऊ- परमेश्वर राठोड यांनी दि. 26 डिसेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

लोहारा  : चालक- बालाजी रमेश टकले, रा. सास्तुर, ता. लोहारा यांनी दि. 13.11.2021 रोजी 19.00 वा. सु. गावातील तावशी रोड फाटा येथील रस्त्यावर मोटारसायकल निष्काळजीपने चालवल्याने समोरुन येणाऱ्या मोटारसायकल क्र. एम.एच. 12 एफजी 9648 ला धडकली. या अपघातात समोरील मो.सा. चा चालक- उभेदुल्ला शेख यांसह मो.सा. वर पाठीमागे बसलेला त्यांचा भाऊ- आबेदउल्ला हे किरकोळ व गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या उबेदउल्ला शेख यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या लेखी निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

अवैध मद्य विरोधी कारवाई

उस्मानागाद -  अंबेजवळगा, ता. उस्मानाबाद येथील नागेश दसत्या गुत्तेदार हे दिइ. 26.12.2021 रोजी 17.00 वा. सु. गावातील तिनकोणी चौकात एका प्लास्टीकच्या कॅनमध्ये 20 लि. ताडी हा अंमली द्रव अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगले असतांना उस्मानाबाद (ग्रा.) पो.ठा. च्या पथकास आढळले. तर रामहरीनगर, भुम येथील सचिन विठ्ठल गाढवे हे जिजाऊ चौक, भुम येथे देशी दारुच्या 11 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगले असतांना भुम पोलीसांना आढळले.

            यावरुन पोलीसंनी अवैध मद्य जप्त करुन नमूद दोघांविरुध्द महाराष्ट्र मद्य निषेध कायद्यांतर्गत संबंधीत पो.ठा. येथे गुन्हे नोंदवले आहेत.

From around the web