उमरगा तालुक्यात दोन अपघातात एक ठार, एक जखमी 

 
Osmanabad police

उमरगा : कसगी, ता. उमरगा येथील सतिश शिवानंद बोरुटे, वय 22 वर्षे हे दि. 04.11.2021 रोजी 18.00 वा. सु. कसगी शिवारातील आळंद- चौरस्ता रस्त्याने पायी जात होते. यावेळी ग्रामस्थ- मल्लिकार्जुन शिवाजी कलशेट्टी यांनी वॅगन आर कार क्र. एम.एच. 14 ईयु 8148 ही निष्काळजीपने चालवून सतिश बोरुटे यांना पाठीमागून धडक दिल्याने बोरुटे यांच्या डोक्यास गंभीर मार लागून ते मयत झाले. अशा मजकुराच्या मयताचे पिता- शिवानंद बोरुटे यांनी दि. 09.11.2021 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ), 338 सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

            दुसऱ्या घटनेत जगदाळवाडी, ता. उमरगा येथील निखिल भानुदास चव्हाण, वय 14 वर्षे हा दि. 03.11.2021 रोजी 10.30 वा. सु. गावातील रस्त्याने पायी जात होते. यावेळी ग्रामस्थ- आकाश दिलीप हाके यांनी मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एटी 7187 ही निष्काळजीपने चालवून निखिल यास पाठीमागून धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला. अशा मजकुराच्या निखिलचे पिता- भानुदास चव्हाण  यांनी दि. 09.11.2021 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 338 सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

सार्वजनिक रस्त्यावर धोकादायकपने वाहन उभे करणाऱ्यावर गुन्हा दाखल

मुरुम  : राम प्रभाकर राठोड, रा. शिवाजीनगर तांडा, दाळींब यांनी दि. 09.11.2021 रोजी 16.00 वा. सु. मुरुम मोड येथील सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायक होईल अशा रीतीने ॲपेरिक्षा वाहन क्र. एम.एच. 25 एन 736 हा उभा करुन भा.दं.सं. कलम- 283 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन गुन्हा नोंदवला आहे.

From around the web