उस्मानाबाद जिल्ह्यात दोन अपघातात एक ठार , एक जखमी 

 
Osmanabad police

येरमाळा : रत्नापुर शिवारातील राष्ट्रीय महामार्ग क्र. 52 वर दि. 21 ऑक्टोबर रोजी 14.00 वा. सु. पिकअप क्र. एम.एच. 25 पी 5579 च्या अज्ञात चालकाने अचानक वाहन थांबवल्याने पाठीमागून येणारी कार त्या पिकअपला पाठीमागून धडकली. या अपघातात कार मधील रुपाली वडवे, वय 30 वर्षे, रा. कोल्हापुर या गंभीर जखमी होउन मयत झाल्या. या अपघातानंतर नमूद पिकअप वाहनाचा अज्ञात चालक अपघात स्थळावरुन वाहनासह पसार झाला. अशा मजकुराच्या कार चालक- प्रविण बाबासाहेब सरवदे, रा. तेरखेडा, ता. वाशी यांनी दि. 22 ऑक्टोबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ), 337 सह मो.वा.का. कलम- 184, 134 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

मुरूम  : चंदु ढाकु पवार, रा. मुरुम, ता. उमरगा हे दि. 18 ऑक्टोबर रोजी 17.00 वा. सु. गावातील दुकानासमोर थांबले होते. यावेळी दिगंबर ग्यानबा गायकवाड, रा. आष्टाकासार, ता. लोहारा यांनी मोटारसायकल क्र. एम.एच. 12 सीएल 1932 ही निष्काळजीपने चालवून पवार यांना पाठीमागून धडक दिल्याने त्यांचा डावा पाय मोडला. अशा मजकुराच्या पवार यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web