ताकविकीजवळ भीषण  अपघात , एक ठार, एक जखमी 

 
crime

बेंबळी  :मयत नामे- आकाश भिमराव शिंदे, वय 16 वर्षे रा. कनगरा, ता. जि. उस्मानाबाद हे दि.18.08.2023 रोजी 20.30 वा. सु. एनएच 361 हायवेवर ताकविकी शिवारातुन अरुण हनमंतराव पाटील यांचे शेत गट नं 182  येथुन बोलेरो क्र एमएच 25 टी 0845 मध्ये बसुन जात होते. दरम्यान आयशर टॅम्पो क्र एमएच 10 डीटी 9919 चालक आरोपी नामे 1) ज्ञानेश्वर सुखदेव अंदाणी, रा. गुगवाड ता जत जि. सांगली यांनी त्यांचे ताब्यातील टॅम्पो हा एनएच 361 हायवेवर ताकविकी शिवारातुन अरुण हनमंतराव पाटील यांचे शेत गट नं 182  येथे हायगई व निष्काळजीपणे उभा केलेला होता. 

तसेच बोलेरो क्र एमएच 25 टी 0845 चालक नामे आरोपी नामे 2) रोहन नानासाहेब लांडे, बोलेरो मालक आरोपी नामे- 3)हनुमंत रावसाहेब साठे, रा ओमनगर तुळजापूर रोड, उस्मानाबाद  वय 17 वर्षे रा. बामणी ता.जि. उस्मानाबाद यांनी त्याचे ताब्यातील बोलेरो ही हायगई व निष्काळजीपणे चालवून आयशर टॅम्पोला मागून उजव्या बाजूने धडक लागून अपघात झाला. या आपघातात  आकाश शिंदे हे गंभीर जखमी होवून मयत झाले. तर राम हनुमंत माळगे वय 17 वर्षे हे गंभीर जखमी झाले.अशा मजकुराच्या बेंबळी पोलीस ठाण्याचे पेालीस अंमलदार/1118 शशिकांत हरिचंद्र सदावर्ते यांनी दि.18.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 337, 338, 304 (अ) मो.वा. का. कलम 3(1)181,5/181,146/196 122/177 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.     


रहदारीस धोकादायरीत्या वाहन उभे करणाऱ्यावर गुन्हा नोंद

 मुरुम  : आरोपी नामे-1) नागनाथ उत्तम माळी, वय 39 वर्षे, रा. आष्टा कासार ता. लोहारा. जि. उस्मानाबाद यांनी दि. 18.08.2023 रोजी 17.30 वा. सु. आपल्या ताब्यातील ॲपे रिक्षा क्र एमएच 25 ईएफ 2978 हा आष्टामोड गावाकडे जाणारे सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना मुरुम पोलीसांना मिळून आले. तर आरोपी नामे- 2) बालाजी ज्योतीराम सुर्यवंशी, वय 36 वर्षे रा. आष्टाकासार, ता. लोहारा जि. उस्मानाबाद यांनी याच दिवशी 17.45 वा. सु. आपल्या ताब्यातील ॲटो रिक्षा क्रएमएच 25 एम 1652 हा एनएच 65 रोडवर आष्टामोड गावाकडे जाणार रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना मुरुम पोलीसांना मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तींविरुध्द भा.द.स. कलम 283 अन्वये मुरुम पो.ठा. येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.

                          

From around the web