धाराशिवजवळ मोटरसायकल अपघातात एक ठार, एक जखमी 

 
crime

धाराशिव : आरोपी नामे- दिनेश उर्फ मयुर अर्जुन गरड,वय 26 वर्षे रा. पिंपरी, ता.जि. उस्मानाबाद सोबत मयत नामे- योगेश कल्याण चव्हाण, रा. चिखली जि. उस्मानाबाद हे दोघे दि.24.04.2023 रोजी 12.15  वा. सु येडशी गावाचे जवळ हायवे रोडवरुन मोटरसायकल क्र एमएच 25एए 4014 यावर जात होते. दरम्यान दिनेश गरड त्याचे ताब्यातील मोटरसायकल ही हायगई व निष्काळजी पणे भरधाव वेगात चालवून हायवेरोड वरील आय.आर.बी. चे उभे असलेल्या रेडकटर मशिन व डिव्हाइडरला धडक दिली. 

या आपघातात योगेश चव्हाण हे गंभीर जखमी होवून मयत झाले. तर दिनेश गरड हे किरकोळ व गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या मयताचा भाउ- गणेश कल्याण चव्हाण यांनी दि.20.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 337, 338, 304 (अ) सह मो.वा. का. कलम 184 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.              


रहदारीस धोकादायकरित्या वाहन उभे करणाऱ्यावर गुन्हा नोंद

परंडा : आरोपी नामे-1)दशरथ बाबुराव कातुरे, वय 32 वर्षे, रा. सोनारी, ता. परंडा ता.जि. उस्मानाबाद यांनी दि.20.07.2023 रोजी 13.30 वा.सु. जुनी एसबीआय बॅकसमोर परंडा बार्शी रोड येथे आपल्या ताब्यातील पिकगप क्र एमएच 25 एजे 5259 हा, तर आरोपी नामे-2) संजय बिभीषन ठवरे, वय 42 वर्षे, रा. कौडगाव, ता. परंडा जि. उस्मानाबाद हे याच दिवशी 14.05 वा. सु. जुनी एसबीआय बॅकसमोर परंडा बार्शी रोड येथे  रस्त्यावर आपल्या ताब्यातील छोटाहत्ती क्र.एम.एच. 25 पी 5289 हा रहदारीस धोकादायकरीत्या उभे करुन भा.दं.वि.सं. कलम- 283 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन परंडा पो.ठा. येथे स्वतंत्र 2  गुन्हे नोंदवले आहेत.


गावशिवारात आरडा ओरड करणाऱ्या मद्यपीवर गुन्हा दाखल

वाशी  : आरोपी नामे- 1)सुरेश उध्दव आठमुठे, वय 32 वर्षे, 2) आश्रुबा बब्रुवान आठमुठे, वय 40 वर्षे दोघे रा. जवळका, ता. वाशी. जि. उस्मानाबाद हे दोघे दि.20.07.2023 रोजी 17.45 वा सुमारास नागरबार जवळ सार्वजनिक ठिकाणी रोडवर मद्यधुंद अवस्थेत आरडा ओरड करून गोंधळ घालताना वाशी पोलीसांना मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द म.द.का. कलम 85(1) सह मपोका 110/117 अन्वये पो.ठाणे वाशी येथे गुन्हा नोंदवला आहे.                            
 

From around the web