तुळजापूर आणि नळदुर्ग येथे अपघात, एक ठार, एक जखमी
तुळजापूर :मयत नामे- संजय सुभाष नवले, वय 50 वर्षे, रा.कळवण, ता. उत्तर सोलापूर जि. सोलापूर हे दि.02.09.2023 रोजी 02.15 वा. सु. सोलापूर ते तुळजापूर रोडने लातुरकडे जाणारे रोडवरुन मोटरसायकल क्र एमएच 13 सीए 0724 वरुन जात होते. दरम्यान टाटा टियागो क्र एमएच 23 एएस 7502 चा अज्ञात चालकाने त्याचे ताब्यातील टाटा टियागो ही हायगई व निष्काळजी पणे अतीवेगाने चालवून संजय नवले यांचे मोटरसायकलला पाठीमागून धडक दिली.
या आपघातात संजय नवले हे गंभीर जखमी होवून मयत झाले. नमुद टाटा टियागो चालक हा अपघाताची खबर न देता व जखमीस उपचारास न नेता अपघात स्थळावरुन पसार झाला. अशा मजकुराच्या फिर्यादी मोहन प्रल्हाद शिंदे, वय 49 वर्षे, व्यवसाय झेरॉक्स दुकान रा. मसला खुर्द, ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद यांनी दि.07.09.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 337, 338, 304 अ सह मो.वा. का. कलम 184 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
नळदुर्ग :जखमी नामे-बंकट नाशिवंत बेडगे, वय 44 वर्षे, रा. हमीद नगर, उमरगा दि.026.08.2023 रोजी 11.00 वा. सु. जळकोट ते नळदुर्ग सोलापूर हैद्राबाद राष्ट्रीय महामार्ग जाणारे रोडवर जळकोट गावापासून अंदाजे एक ते दीड किलोमिटर अंतरावरुन स्कुटी क्र एमएच 25 एपी 3602 वरुन जात होते. दरम्यान मोटरसायकल क्र एमएच 25 एझेड 3120 चा चालक नामे अभिमान शिवाजी भुसणे, रा. हमीद नगर, ता. उमरगा यांनी त्याचे ताब्यातील मोटरसायकल ही हायगई व निष्काळजी पणे अतीवेगाने चुकीच्या दिशेने चालवून बंकट बेडगे यांचे मोटरसायकलला समोरुन धडक दिली.
या आपघातात बंकट बेडगे हे गंभीर जखमी झाले. नमुद मोटरसायकल चालक हा अपघाताची खबर न देता व जखमीस उपचारास न नेता अपघात स्थळावरुन पसार झाला. अशा मजकुराच्या फिर्यादी अनिल नाशिवंत बेडगे यांनी दि.07.09.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 337, 338, सह मो. वा. का. कलम 134 (अ) (ब), अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
रहदारीस धोकादायरीत्या वाहन उभे करणाऱ्यावर गुन्हा नोंद
नळदुर्ग : आरोपी नामे-1) चंदुरपांडी सुभय्या एस, वय 56 वर्षे रा. रा. उडाकुंडी ता.श्री. वईकुंउम, जि. ततुकरी, राज्य तामीळनाडू यांनी दि. 07.09.2023 रोजी 08.40 वा. सु. आपल्या ताब्यातील टाटा टेलर के.ए. 51 9065 हा एनएच 65 रोडवर आलियाबाद पुलाचे जवळ रोडवर नळदुर्ग ता. तुळजापूर येथे सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना नळदुर्ग पोलीसांना मिळून आले. तर आरोपी नामे-1) इसमोद्दीन सलिमोद्छीन बगदलवाले, वय 26 वर्षे,रा. कपरगाव, ता. हुमनाबाद जि. बिदर, राज्य कर्नाटक यांनी दि. 07.09.2023 रोजी 08.30 वा. सु. आपल्या ताब्यातील टाटा टेलर के.ए. 56 7099 हा एनएच 65 रोडवर आलियाबाद पुलाचे जवळ रोडवर नळदुर्ग ता. तुळजापूर येथे सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना नळदुर्ग पोलीसांना मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द भा.द.स. कलम 283 अन्वये नळदुर्ग पो.ठा. येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.