अणदूरजवळ मोटारसायकलकला ट्रकची धडक, एक ठार, एक जखमी 

 
crime

नळदुर्ग  : मयत नामे- बालाजी अनिल पवार, वय 23 वर्षे रा. रानमसले, ता. उत्तर सोलापूर जि. सोलापूर सोबत फिर्यादी नामे- राहुल लक्ष्मण चौगुले, वय 19 वर्षे, रा. देशमुख वस्ती, अणदुर, ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद हे दोघे दि. 11.07.2023 रोजी 19.00 वा. सु. मुर्टी पाटी ते साई प्रसाद हॉटेलच्या दरम्यान असलेल्या रोडवरुन मोटरसायकल क्र एमएच 13 ईबी 3157 वरुन अणदुर ते जळकोट येथे जात होते. 

दरम्यान ट्रक क्र एपी 39 डब्ल्यु 2288 च्या चालकाने त्याचे ताब्यातील ट्रक ही  हायगई व निष्काळजी पणे अतीवेगाने चालवून फिर्यादी नामे राहुल चौगुले यांचे मोटरसायकलला पाठीमागून धडक दिली. या आपघातात मयत नामे बालाजी पवार हे गंभीर जखमी होवून मयत झाले. तर राहुल चौगुले हे गंभीर व किरकोळ जखमी झाले. अशा मजकुराच्या राहुल चौगुले यांनी दि.16.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 337, 338, 304 (अ) सह मो.वा. का. कलम 184, अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

  मद्यपी चालकावर गुन्हा दाखल

तुळजापूर  : आरोपी नामे- सागर उर्फ  अतुल अशोकराव घोम, वय 32 वर्षे, रा. घुगांव, ता. अचलपूर जि. अमरावती हे दि.16.07.2023 रोजी 13.50 वा. सु. आपआपल्या ताब्यातील मोटरसायकल क्रं एमएच 12 जीएस 1194 ही विश्वनाथ कॉर्नर तुळजापूर येथे रस्त्यावर मद्यधुंद अवस्थेत चालवून मो.वा.का. कलम- 185 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द तुळजापूर पो. ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.

उमरगा  : आरोपी नामे- 1)दशरथ उर्फ आशितोष राजू कांबळे, वय 23 वर्षे, रा. मुळज,ता. उमरगा जि.उस्मानाबाद हे दि.16.07.2023 रोजी 13.30 वा. सु.आपल्या ताब्यातील मोटरसायकल ही उमरगा बसस्थानक रस्त्यावर, तसेच आरोपी नामे-2) मुल्ला अहमद अब्दुल शेख, वय 45 वर्षे, रा. कास्ती ता. लोहारा जि. उस्मानाबाद हे दि. 16.07.2023 रोजी 16.15 वा. सु. आपल्या ताब्यातील मोटरसायकल ही उमरगा बसस्थानक समोर रस्त्यावर, तर आरोपी नामे 3) गणेश किसनराव आडे, वय 40 वर्ये रा. ह.मु. साईधाम, उमरगा ता. उमरगा जि. उस्मानाबाद  हे दि.16.07.2023 रोजी 13.45 वा. सु. आपल्या ताब्यातील मोटरसायकल ही उमरगा बसस्थानक समोर रस्त्यावर मद्यधुंद अवस्थेत चालवून मो.वा.का. कलम- 185 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द उमरगा पो. ठाणे येथे स्वतंत्र 3 गुन्हे नोंदवले आहेत.


 रहदारीस धोकादायकरित्या वाहन उभे करणाऱ्यावर गुन्हा नोंद

धाराशिव  : आरोपी नामे-फिरोज मंजुर शेख, वय 36 वर्षे, रा. श्म्स चौक, खाजा नगर, उस्मानाबाद यांनी दि.16.07.2023 रोजी 01.30 वा.सु. येडशी टोलनाक्याजवळील एनएच 52 उस्मानाबाद बीड  रस्त्यावर आपल्या ताब्यातील ट्रक क्र.एम.एच. 13 आर 3612 हा रहदारीस धोकादायकरीत्या उभे करुन भा.दं.वि.सं. कलम- 283 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन उस्मानाबाद ग्रामीण पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.

                                                                               

From around the web