धाराशिव जिल्ह्यात दोन अपघातात एक ठार, चार जखमी 

 
crime

धाराशिव  : आरोपी नामे- लक्ष्मण व्यंकट इंगळे, रा. करजखेडा ता. जि. उस्मानाबाद सोबत मयत नामे- प्रकाश किसन गायकवाड, वय 40 वर्षे, रा. पाटोदा, ता. जि. उस्मानाबाद हे दोघे दि.022.08.2023 रोजी 16.00 वा. सु. बेंबळी रोडवर अमर पॅलेस जवळील डीपी समोरुन  मोटरसायकल क्र एमएच 25एवाय 9607 वरुन जात होते दरम्यान नमुद आरोपीने त्याचे ताब्यातील मोटरसायकल ही हायगई व निष्काळजी पणे अतीवेगाने चालवून ब्रेक मारल्याने मोटरसायकल स्लीप होवून पडून प्रकाश गायकवाड हे मोटरसायकलला खाली पडून गंभीर जखमी  होवून मयत झाले. तर लक्ष्मण इंगळे हे  स्वता जखमी झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी रणी प्रकाश गायकवाड,वय 35 वर्षे, रा. पाटोदा, ता. जि. उस्मानाबाद यांनी दि.10.09.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 304 (अ) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

ढोकी  :जखमी नामे- नवनाथ भागवत काटे, वय 40 वर्षे, रा. जवळे दु. ता. जि. उस्मानाबाद हे दि.31.08.2023 रोजी 08.45 वा. सु. डोकी ते तडवळा कडे जाणारे रोडवर ढोकी पासून 1 किलोमिटर अंतरावर  मोटरसायकल क्र एमएच 25 एजी 3336 वर बसून जाते होते दरम्यान टाटा सपारी क्र एमएच 12 एएच 7041 चा चालकांनी त्यांचे ताब्यातील टाटा सफारी ही हायगई व निष्काळजी पणे अतीवेगाने चालवून नवनाथ काटे यांचे मोटरसायकलला धडक दिली यामध्ये नवनाथ काटे हे गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नवनाथ काटे यांनी दि.10.09.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 337, 338, सह मो.वा. का. कलम 134 (अ) (ब), 184 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

येरमाळा  :जखमी नामे- त्रिंबक रामहारी जाधवर, वय 67 वर्षे, रा. वडजी, ता. वाशी जि. उस्मानाबाद व सोबत शिवाजी विठोबा मोराळे, वय 92 वर्षे, हे दोघे दि. 07.07.2023 रोजी 15.30 ते 16.00 वा. सु. तेरखेडा ते वडजी जाणारे दिनकर जाधवर यांचे शेताजवळुन मोटरसायकल क्र एमएच 13 एवाय 4336 वरुन जात होते दरम्यान विना नंबर मोटरसायकल  चालक नामे- श्रीकांत प्रभाकर जाधवर, रा. वडजी, ता. वाशी जि. उस्मानाबाद यांनी त्यांचे मोटरसायकल ही हायगई व निष्काळजी पणे अतीवेगाने चालवून त्रिंबक जाधवर यांचे मोटरसायकलला समोरुन धडक दिली यामध्ये त्रिंबक जाधवर व शिवाजी मोराळे हे गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी त्रिंबक जाधवर यांनी दि.10.09.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 337, 338, सह मो.वा. का. कलम 134 (अ) (ब), 184 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

रहदारीस धोकादायरीत्या वाहन उभे करणाऱ्यावर गुन्हा नोंद

नळदुर्ग  : आरोपी नामे-1) आप्पाराव बाबु गायकवाड, वय 43 वर्षे रा. रा. अणदुर, ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद यांनी दि. 10.09.2023 रोजी 17.00 वा. सु. आपल्या ताब्यातील टमटम क्र एमएच 23 एच 8597 हा बस स्थानक च्या उजवे गेटच्या कडेला नळदुर्ग येथे सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना नळदुर्ग पोलीसांना मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द भा.द.स. कलम 283 अन्वये वाशी पो.ठा. येथे  गुन्हा नोंदवला आहे.

                       

From around the web