उस्मानाबाद जिल्ह्यात तीन अपघातात एक ठार चार जखमी 

 
Osmanabad police

उस्मानाबाद  : ढोकी, ता. उस्मानाबाद येथील अब्दुललतीफ इसाक शेख व त्यांच्या पत्नी- तय्यबी शेख, वय 60 वर्षे हे दोघे दि. 11.11.2021 रोजी 14.30 वा. सु. गडपाटी कमानीजवळील राष्ट्रीय महामार्ग क्र. 52 वरुन मोटारसायकल क्र. एम.एच. 25 डब्ल्यु 2998 ने प्रवास करत होते. यावेळी येडशीकडून आलेल्या कार क्र. एम.एच. 12 क्युएम 6761 ने त्यांना पाठीमागून धडक दिली. या अपघातात तय्यबी शेख या मयत झाल्या तर अब्दुललतीफ शेख हे गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या मयताचा मुलगा- इन्नुस शेख यांनी दि. 15 नोव्हेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

ढोकी : रामलिंग बसप्पा मासोडे, रा. आलुर यांनी दि. 13.11.2021 रोजी 17.45 वा. सु. गोवर्धनवाडी येथील रेल्वे फाटा रस्त्यावर कार क्र. एम.एच. 25 आर 4771 ही निष्काळजीपने चालवून समोरील मोटारसायकल क्र. एम.एच. 13 वाय 5442 ला पाठीमागून धडक दिली. या अपघातात मो.सा. चालक- गोविंद वाघमोडे, रा. गोवर्धनवाडी यांसह त्यांच्या पाठीमागे बसलेले श्रीराम वाघमोडे हे दोघे गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या गोविंद वाघमोडे यांनी दि. 15 नोव्हेंबार रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

कळंब : कळंब येथील कलाबाई सिरसाट या दि. 09.11.2021 रोजी 19.30 वा. सु. कळंब येथील महावितरण कार्यालयासमोरील रस्त्याने पायी चालत जात होत्या. यावेळी एका मोटारसायकलच्या धडकेत त्या गंभीर जखमी होउन त्यांच्या उजव्या पायाचे हाड मोडले. या अपघातानंतर जखमीस वैद्यकीय उपचाराची तजबीज न करता, अपघाताची खबर नजीकच्या पोलीस ठाण्यास न देता अज्ञात मो.सा. चालक अपघातस्थळावरुन वाहनासह पसार झाला. अशा मजकुराच्या कलाबाई सिरसाठ यांनी दि. 15 नोव्हेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 सह मो.वा.का. कलम- 184, 134 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web