उस्मानाबाद जिल्ह्यात दोन अपघातात एक ठार , पाच जखमी 

 
Osmanabad police

मुरुम : चालक- खुतबोद्दीन इमाम शेख, रा. केसरजवळगा, ता. उमरगा यांनी दि. 27.12.2021 रोजी 05.30 वा. सु. येणेगुर येथील राष्ट्रीय महामार्ग क्र. 65 वर ट्रक क्र. के.ए. 39- 9843 हा निष्काळजीपने चालवल्याने समोरील कार क्र. एम.एच. 43 एजे 6699 ला पाठीमागून धडकला. या अपघातात नमूद ट्रक चालक गंभीर जखमी होउन मयत झाला. तर त्याचा मदतनीस- तमिज वलिषा इनामदार यांसह कार चालक- त्रिंबक विश्वंभर पांचाळ, रा. कोरेगाव, ता. उमरगा व कारमधील- सविताबाई लोखंडे हे जखमी झाले. यासोबतच अपघातात ट्रक व कारचे आर्थिक नुकसान झाले आहे. अशा मजकुराच्या त्रिंबक पांचाळ यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 304 (अ), 427 सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद  : चालक- अशोक व्यंकटेय्या पेनलीमाडगु, रा. गुडुर, ता. कोथूर, जि. महेबुबनगर, राज्य- तेलंगण हे दि. 19.12.2021 रोजी 04.00 वा. सु. आळणी शिवारातील रस्त्यावरील वळणावर मारुती ब्रेझा कार क्र. टी.एस. 07 जीएस 6858 ही निष्काळजीपने चालवल्याने रस्ता दुभाजकास धडकून पलटली. या अपघातात चालकासह कारमधील अन्य 2 प्रवासी जखमी झाले. अशा मजकुराच्या कारमधील प्रवासी- रामाराव सीनया नावापेटा, रा. रंगापुर, ता. कोथुर, जि. महेबुबनगर यांनी दि. 27 डिसेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337 सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

                                                                                               

From around the web